google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात शांतता समिती बैठक

Breaking News

सांगोला तालुक्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात शांतता समिती बैठक

सांगोला तालुक्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन


गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात शांतता समिती बैठक

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- विधायक व रचनात्मक तसेच पर्यावरण पूरक कार्यक्रमानी गणेशोत्सव साजरा व्हावा, एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न व्हावे, 

शांततेत सर्व सण साजरे करणे हे प्रत्यकाचे कर्तव्य असून आगामी उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करुन डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांनी केले.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर मंगळवार रोजी पंचायत समितीच्या सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी सुरज बनसोडे, अरविंद केदार, किशोर बनसोडे, तुषार इंगळे, बापूसाहेब ठोकळे, 

पत्रकार संतोष साठे,अस्मिर तांबोळी, कमरुद्दीन खतीब, रवी कांबळे, दीपक बनसोडे, विनोद रणदिवे, दामोदर साठे, बापूसाहेब भाकरे यांच्यासह गणेश मंडळ पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते.

गणपती या संकल्पनेवर भर द्यावा, एकोपा ठेवून सामाजिक सलोखा ठेवावा, गणेश मंडळानी विसर्जनाचा मार्ग प्रशासनास कळवावा, सुरक्षितेच्या दृष्टीने गणेश मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या सूचनाही पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आल्या.

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत राखण्याकरिता पोलीस दल सक्षम असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यावर पोलीसांची करडी नजर असणार 

असल्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी सांगितले. या सण-उत्सवाच्या अनुषंगाने काही समाजकंटकाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जातात. 

अशा आक्षेपार्ह पोस्टना गावातील तरुणाईने प्रतिसाद न देता याची माहिती पोलिसांना त्वरित द्यावी. सण, उत्सव साजरा करताना धार्मिक, सामाजिक सलोखा टिकून राहील, यासाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे,' असे आवाहन केले.

पर्यावरण पूरक उत्सव, तसेच वृक्षारोपण, स्वच्छता, स्त्रीभ्रूण हत्या थांबवाव्या, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान, आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन करत गणेश उत्सव काळात वीज प्रवाह खंडित होऊ नये,

 डीजे लावू नये, मंडळानी मूर्ती जवळ स्वयंसेवक नेमावे, प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, कुणाच्याही धार्मिक भावना दुःखऊ नये अशा सूचना केल्या.

पुढे बोलताना विक्रम गायकवाड म्हणाले, यावर्षी दोन्ही धर्मीयाचे सण एकत्र आले आहेत. दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावेत,

 गणपती मंडळानी समाजात तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, तसेच ध्वनी प्रदुषणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा.

 नागरिकानी स्वतः होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यात एक गाव एक

Post a Comment

0 Comments