सांगोला तालुक्यात जावयाच्या सासुरवाडीच्या चकरा वाढल्या, झेरॉक्स, नेट कॅफे जोरात कोळा जुनोनी परिसरात दृश्य...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळा वार्ताहर : सांगोला तालुक्यातील कोळा कोंबडवाडी कराडवाडी जुनोनी गोडवाडी सोमेवाडी जुजारपूर डोंगर पाचेगाव किडबिसरी परिसरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना
जाहीर झालेपासून ऐन सणासुदीतही आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून सासुरवाडीकडे कधीही वाट न वाकडी करणाऱ्या जावई बापूंच्या सध्या मात्र सासुरवाडीच्या चकरा वाढल्या आहेत.
आपल्या अर्धांगिनीच्या शाळा सोडल्याचा दाखला व अन्य कागदपत्रे मिळवण्यासाठी या जावयाची सासुरवाडीची एन्ट्री मात्र सासऱ्याची ऐन आखडात चांगलीच खरवड निघत असल्याचे चित्र आहे.
नेट कॅफे व महा-इ सेवा केंद्र चालक,झेरॉक्स वाले यांची कागदपत्रे झेरॉक्स व फॉर्म भरून घेतांना चांदी असल्याचेही या ठिकाणची गर्दी पाहिल्यावर दिसते आहे.परिसरात हे फॉर्म भरून घेतांना अतिरिक्त रक्कम कुणी आकारत
असल्याच्या तूर्त तरी तक्रारी नाहीत.एकंदरीतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे प्रवासी वाहने, झेरॉक्स सेंटर, हॉटेल,बेकरी व्यवसायिक , मटण विक्रेते, फळविक्रेते यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे.
महिला वर्ग शेतीतील कामधंदा सोडून या योजनेकरिता लागणारी कागदपत्रे जमा करण्यातच व्यस्त झाल्या आहेत.
त्यांच्याबरोबर त्यांनी आपल्या कारभाऱ्यांनासुद्धा या कामाला त्यांनी लावले असल्याचे चित्र आहे.महिला गावातून पोलिस पाटील, सरपंच,तलाठी,आण्णासाहेब यांची सही घेतली की आपला मोर्चा एकतर
नेट कॅफे किंवा थेट तहसीलकडे वळवित असल्याने एसटी बस, खासगी वाहतुकीला गर्दी दिसत आहे. खासगी वाहनधारकांचाही व्यवसाय सध्या तेजीत चालला आहे, त्याचबरोबर झेरॉक्स सेंटरला तर चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत.
जावई सासुरवाडीला जाणार म्हणल्यावर आपल्या सासू-सासऱ्यांना,मेहुण्यांच्या मुलांना खाऊ घेऊन जाण्यासाठी हॉटेल, फळविक्रेते,बेकरी व्यावसायिक यांचेकडे जाऊन खरेदी करत असल्याने यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे.
तर प्रदीर्घ वर्षांनी सासुरवाडीच्या दिशेने प्रस्थान केलेल्या जावई बापूंची बडदास्त ठेवण्यासाठी सासर्यांना देखील मटण दुकानातून मटण खरेदी करून जेवण बनवून खाऊ घालून जावयाला अलविदा करतांना या सासुरवाडीच्या मंडळीचीही पुरती ऐन आखाडी मध्ये दमछाक होते आहे.
गेली कित्येक दिवस पावसाची रिपरिप सुरू आहे.सध्या शेतीकामे खोळंबली आहेत.उघडीप होताच दोन तीन दिवसात कुळवणे, खुरपणी, खत टाकणे आदी कामे सुरू होतील;त्या अगोदर ही कागदपत्रांची जुळवा-जुळव करून ठेवण्याला अनेकांनी पसंदि दिल्याचे दिसते आहे.
ही योजना सुरू झाली तेव्हापासून मजूर वर्गही याच कामात व्यस्त असल्याने शेतीकामासाठी मजुरांचा मोठा तुटवडा भासत आहे. कागदपत्रे अटी दिवसेंदिवस शिथिल होत असल्याने अनेकजण द्विधा अवस्थेत आहेत.डोमेसाईल,
उत्पन्नाचा दाखला ही अट शिथिल केल्याने गर्दी थंडावलीपरिसरातील अन्य उद्योगधंद्यांची चांदी तर एसटी बस, खासगी वाहतुकीला गर्दी होताना दिसत आहे.
खासगी वाहनधारकांचाही व्यवसाय सध्या तेजीत चालला आहे. त्याचबरोबर झेरॉक्स सेंटरला तर चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. हॉटेल, फळविक्रेते यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे. सध्या शेतीकामाची लगबग सुरू आहे.
मात्र मजूर वर्ग याच कामात व्यस्त असल्याने शेतीकामासाठी मजुरांचा मोठा तुटवडा भासत आहे.आहे. योजनेकरिता कागदपत्रे जुळविताना महिलांची मोठी दमछाक होत असल्याने डोमेसाईल, उत्पन्नाचा दाखला यात शिथिलता आली आहे.
ज्यांच्याकडे पिवळी वा केशरी शिधापत्रिका आहे, अशांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द केली आहे. ज्यांच्याकडे १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड, जन्माचा दाखला आहे अशांना डोमेसाईलची अटही रद्द केली आहे. त्यामुळे थोडा फार दिलासा मिळाला आहे.
एकिकडे व्यावसायिकांचा फायदा होत असताना शेतकर्याना मात्र मजूर तुटवड्यामुळे फटका बसत आहे.पण पाऊस सुरू असल्याने शेती कामे उघडीपी नंतर बघू असे म्हणत अनेकजण या योजनेची कागदपत्रे जुळवा जुळवीत व्यस्त आहेत.
0 Comments