google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विविध कार्यक्रम

Breaking News

स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विविध कार्यक्रम

स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विविध कार्यक्रम

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गणपतराव देशमुख यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त बुधवारी ७ ऑगस्ट रोजी

 भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, 

यामध्ये पहिली ते चौथी प्रथम क्रमांकासाठी १००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७०१ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ५०१ रुपये, इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांकासाठी १००१ द्वितीय 

क्रमांकासाठी ७०१ व तृतीय क्रमांकासाठी ५०० एक रुपये, इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक आसाठी १००१ द्वितीय क्रमांकासाठी ७०१ व तृतीय क्रमांकासाठी ५०१ रुपये 

ज्युनिअर कॉलेज विभागासाठी प्रथम क्रमांक १००१, ७०१, तृतीय ५०१, सीनियर कॉलेज गट प्रथम क्रमांक १०१, द्वितीय ७०१, तृतीय ५०१ अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजता रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यातआले आहे. यामध्ये ( फक्त सांगोला शहरातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी) प्रथम १० विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १५०,

 द्वितीय क्रमांक दहा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १२०, तृतीय क्रमांक १० विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १०० व उत्तेजनार्थ २० विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ८० रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक आठ वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी माझी वसुंधरा, 

आई खरंच काय असते?, आमचे आबासाहेब स्व.डॉ. गणपतराव देशमुख हे विषय तर इयत्ता पाचवी ते सातवी साठी स्वच्छतेतून समृद्धीकडे,

 गाव माझा मी गावाचा, माझे आवडते व्यक्तिमत्व स्व.डॉ. गणपतराव देशमुख. हे विषय आहेत तर इयत्ता आठवी ते दहावी साठी असा घडवूया महाराष्ट्र, मुकी होत चाललेली घरे, 

मा. डॉ. गणपतराव देशमुख यांचे कार्य, तर ज्युनियर गटासाठी रील्सः - स्वैराचाराला आमंत्रण देता येत का ?
शब्द माझे माझीया हातातील तलवार आहे, राजकारणातील दीपस्तंभ

 मा. डॉ. गणपतराव देशमुख, हे विषय आहेत, तर सीनियर कॉलेज गटासाठी भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्याला कष्ट, जगी सर्व सुखी असा कोण आहे?, विधानसभेचे विद्यापीठ डॉ. गणपतराव देशमुख. 

असे विषय असून पहिली ते चौथी प्रथम क्रमांक ५०० द्वितीय क्रमांक ३०० तृतीय क्रमांक २०० तर उत्तेजनार्थ १०० अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रत्येक शाळेवरती पोहोच केलेली आहे, त्यानुसार सर्व नियम व अटीचे पालन करावे व जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन 

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा. केशव माने, डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सिकंदर मुलानी, उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव, 

उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, पर्यवेक्षक श्री तातोबा इमडे सर, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे

 मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार, सौ स्मिता इंगोले मॅडम व प्रा. डॉ. जगन्नाथ ठोंबरे, यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments