सांगोला जुना मेडशिंगी, बुंजकर वस्तीजवळ अपघात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी वरील युवक गंभीर जखमी होऊन ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) ट्रॅक्टरच्या धडकेत डोक्याला गंभीर मार लागून २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला असल्याची घटना गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास
सांगोला शहरातील जुन्या मेडशिंगी रोड वरील बुंजकर वस्तीजवळ घडला आहे. स्वप्निल भारत लवटे वय २२ रा. मेडशिंगी (धायगुडे वस्ती) ता. सांगोला असे मत तरुणाचे नाव आहे
ता. सांगोला असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत स्वप्निल लवटे हा सांगोला शहरातील बाळासाहेब होनराव यांच्या किराणा दुकानात कामास होता गुरुवारी रात्री साडेआठ
वा.च्या सुमारास दुकानातील काम संपल्यानंतर तो एमएच ४५ एच १६२९ या दुचाकीवरून सांगोला ते जुना मेडशिंगी रोडने घराकडे निघाला होता वाटेत बुंजकर वस्ती जवळ ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला धडक
दिल्याने हा अपघात घडला. अपघातात स्वप्निलच्या डोक्याला गंभीर मार लागून जख्मी अवस्थेत रस्त्यावर पडल्याने बुंजकर वस्ती येथील नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून
त्यास तातडीने उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले याबाबत पोपट रामचंद्र लवटे यांनी पोलिसात खबर दिली आहे.
0 Comments