एस.सी., एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर विरोधात सांगोल्यात बंद बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसीलदार याना निवेदन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुका व शहर मध्ये कडकडीत बंद
1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यातील वर्गीकरणाबाबत निकाल दिला.
त्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांनी भारत बंदची हाक दिली.त्याला प्रतिसाद म्हणून बहुजन समाज पार्टीने सांगोला तालुका व शहर मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.
शतकानु शतके वंचित, दलित आणि शोषित असलेल्या कोट्यावधी अनुसूचित जाती व जमातीवर घोर अन्याय करून मा.सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या वर उठून आपला निर्णय दिला आहे .
मा.सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि इतर विरुद्ध देविंद्र सिंग या निकालात भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 व कलम 342 ला संपवले आणि आरक्षणाची अंत्ययात्रा काढली .
बहुजन समाज पार्टीने याच्या विरोधात भारत बंदची हाक दिली .यामध्ये सांगोला तालुक्यातील व्यापारी संघटना दुकानदार व सर्व सामान्य जनता यांनी भारत बंदला साथ दिली
त्यांचेही बहुजन समाज पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीने मागणीपत्र /निवेदन पत्र देऊन त्यामध्ये
1. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारवर तात्काळ बंदी घालण्यात यावे .
2. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घेणे व कलम 341 व कलम 342 यामध्ये कोणतीही छेडछाड करता येणार
नाही असे विधेयक मंजूर करून परिशिष्ट नऊ मध्ये समाविष्ट करण्यात यावे .
3. सर्वोच्च न्यायालयाने वर्षानुवर्षे लागू केलेले आरक्षण (कॉलेजियम प्रणाली) रद्द करण्यात यावे.
अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.राष्ट्रपती व मा.पंतप्रधान साहेब यांना करण्यात आले .
यावेळी बहुजन समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा प्रभारी मा.मिलिंद बनसोडे, जिल्हा सचिव कुंदनजी बनसोडे, विधानसभा प्रभारी शशिकांत( बाळासाहेब) गडहिरे ,विधानसभा प्रभारी कालिदास कसबे, विधानसभा अध्यक्ष संदीप बनसोडे,
विधानसभा महासचिव अजय ठोकळे ,विधानसभा कोषाध्यक्ष प्रशांत चंदनशिवे ,विधानसभा बी व्ही एफ अमर सोनवले, बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते लकी कांबळे,
बहुजन मुक्ती पार्टीचे नेते इरफान फारुकी शौकत भाई खतीब, संतोष खडतरे तसेच बीएसपी चे कार्यकर्ते सुहास बनसोडे, साईनाथ बनसोडे, राजू जालिंदर माने,
अण्णा भाऊसाहेब काटे, दत्ता नवघरे, सुशांत बाबर ,अविनाश सूर्यगंध ,दत्ता वाघमारे ,व इतर मुस्लिम बांधव व बहुजन समाज पार्टीचे इतर कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments