google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..आश्रमात ठरतेय मुलींच्या शरीराची किंमत, पश्चिम महाराष्ट्रात दिवसाढवळ्या घडत होतं कराड तालुक्यातील घृणास्पद कृत्य!

Breaking News

खळबळजनक..आश्रमात ठरतेय मुलींच्या शरीराची किंमत, पश्चिम महाराष्ट्रात दिवसाढवळ्या घडत होतं कराड तालुक्यातील घृणास्पद कृत्य!

खळबळजनक..आश्रमात ठरतेय मुलींच्या शरीराची किंमत, पश्चिम महाराष्ट्रात दिवसाढवळ्या घडत होतं कराड तालुक्यातील घृणास्पद कृत्य!


सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली एका आश्रमात अश्लील प्रकार सुरू असल्याचा प्रक्रार समोर आला आहे. कराड तालुक्यातील एका आश्रमामध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू असल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आश्रमात आश्रय देण्याच्या नावाखाली शारीरिक व मानसिक त्रास देऊन देहविक्रीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची घटना समोर आली आहे.

कराड तालुका हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात खेड्यापाड्यातून अनेक अनाथ लोकांना आश्रय दिला जातो.

 मात्र या आश्रमात आश्रय दिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. या आश्रमामध्ये आश्रय चालक मतिमंद मुली, 

महिलांकडून मालिश करण्याचं काम करवून घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच मुलीने जर सांगितलेलं काम ऐकलं नाही तर तिला मारहाण देखील करत असल्याचं समोर येत आहे.

 एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिलांच्या स्वयंपाक घरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बाटल्या घेऊन त्या पॅक बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे.

आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमाच्या अध्यक्षा आणि वधू वर सूचक आधार केंद्राच्या एजंट मध्ये मुली मुलांच्या फसवणुकीचा गोड बंगाल समोर आला आहे. महाराष्ट्रात विना लग्नाच्या मुलांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. 

अशा मुलांना आपल्या गळाशी लावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात येत आहेत. एक मुलगी अनेक ठिकाणी लग्न करून आपला स्वार्थ साधत संस्था चालक महिला मालामाल झालेली आहे.

या संपूर्ण प्रकारातून पैसे कमी पडत असल्यामुळे लहान आणि मतिमंद मुलींची देहविक्री करून पैसे उकळण्याला सुरुवात केली. एका कस्टमरशी लहान मुलीच्या देहासाठी एक ते दोन लाख रुपये लागत

 असल्याचं या ऑडिओ मधील महिलेकडून बोलले जात आहे. तर समोरून व्यक्ती फक्त एन्जॉय करण्यासाठी मुलगी हवी आहे, असं बोलत असल्याचा ऑडिओ समोर आला आहे..

संबंधित तक्रारदार महिलेने स्वतःवरील अनुभव शेअर करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ती तक्रार घेऊन कराड तालुका पोलिसात गेली असता तिची तक्रार फक्त तक्रार अर्ज म्हणूनच घेतली 

असून यावर कारवाई मात्र केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात पोलिसांचा रोल काय असा प्रश्न समोर आलेला आहे.

 शहरांच्या चौकात पोलीस हफ्ता घेत असल्याच्या गप्पा रंगू लागलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे गृहखात्याची मान शरमेनं झुकलेली दिसत आहे.

 या संपूर्ण प्रकरणावर सातारा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments