google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'मविआकडे 10-12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते'; शहाजीबापूंचा उद्धव ठाकरेंना टोला

Breaking News

'मविआकडे 10-12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते'; शहाजीबापूंचा उद्धव ठाकरेंना टोला

'मविआकडे 10-12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते'; शहाजीबापूंचा उद्धव ठाकरेंना टोला


काय झाडी, काय डोंगर फेम शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. पंढरपूर येथे दिवंगत नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या

 चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त ते आज आदरांजली वाहायला आले यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

उद्धव ठाकरे यांनी केलेली युतीच तत्वहीन असल्याचे सांगत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या

 तत्वाचा पायाच उध्वस्त करत त्यांनी वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. 

तो शिवसैनिकांसाठी वेदनादायी होता. तसेच उद्धव ठाकरेंवर प्रेम असले तरी सच्चा शिवसैनिक स्वर्गिय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडणार नाही. असे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.

विधानसभेसाठी मविआचा चेहरा कोण?

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल 

यावरून राज्यात चर्चा सुरु असताना मुख्यमंत्रीपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, 

मी पाठींबा देतो अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments