महुद येथे स्व.आबासाहेबांच्या जयंती निमित्त भव्य मोटारसायकल रॅली व मेळाव्याचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना महुद जिल्हा परिषद गटाच्या वतीने महुद बु!!येथे तिनं हजार मोटार सायकल रॅलीचे व भव्य मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक 20/8/2024 रोजी करण्यात आले असुन.
सदर मेळाव्याच्या आध्यक्षस्थानी माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा.धैर्यशिल मोहिते पाटिल हे असणार आहेत
तर प्रमुख पाहुणे म्हणुन शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार भाई बाळाराम पाटील असणार असुन प्रमुख वक्ते
माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणिस रामहरी रुपनवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.महत्व पुर्ण आशा या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख आसणार आहेत.
स्व.आबासाहेबांनी आयुष्यभर शेतकरी,कष्टकरी ,कामगार,दलीत,विद्यार्थी ,युवक व महीलांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवीला..
व सभागृहाबाहेर सुध्दा विविध आंदोलने केली होती.सर्व सामांन्य लोकांचे प्रश्न सरकार दरबारी पोहचवण्यासाठी अनेक वेळा मेळावे सुध्दा घेतले होते..
आजही शेतकऱ्यांच्या ,कष्टकऱ्यांच्या,कामगारांच्या ,दलीतांच्या,विद्यार्थ्यांच्या,युवकांच्या व महिलांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत..
अनेक प्रश्न उपस्थीत होत आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आसुन
या मेळाव्याची सुरवात 3 हजार मोटार सायकलच्या भव्य रॅलीने दुपारी 3-00 वाजता होणार आसुन रॅली मध्ये सर्व मांन्यवर सुध्दा सहभागी होणार आहेत.सरकारचे व सुस्त प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी या
रॅली मध्ये पारंपारीक वाद्याबरोबरीने नावींन्यपुर्ण वाद्यांचाही समावेश असणार आसुन त्यामध्ये तीन हालगी ग्रुप ,तिनं सुर-सनई वाद्यवृंद , तिनं डाॅल्बी ,रंगी-बिरंगी कागदी प्रेशर तोफा,फटाक्याची आतषबाजी तसेच
रॅलीमध्ये सहभागी असलेले मांन्यवर पाहुणे तसेच शेतकरी ,कष्टकरी ,कामगार,दलीत,विद्यार्थी ,महिला व युवक व सर्व नागरीकांचे स्वागत जेसीबीतुन पुष्पवृष्टी करून करण्यात येणार आसुन . रॅलीच्या समाप्तीनंतर
सायंकाळी ५=०० वाजता आपले प्रेरणास्थान स्व.आबासाहेबांच्या प्रतीमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करुन उपस्थित जनसमुदाय अबासाहेबांना अभिवादन करेल व या मेळाव्यास सुरुवात होईल.
सदर मेळाव्यास सांगोला विधानसभा मतदार संघातील विविध पदाधिकारी ,नेते ,कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी तसेच
आबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक मांन्यवर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. तरी सांगोला विधानसभा मतदार संघातील
शेतकऱ्यांनी,कष्टकऱ्यांनी,कामगारांनी ,दलीता़नी,विदयार्थ्या़नी ,युवकांनी व महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मेळाव्यास उपस्थीत राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी केले आहे..
0 Comments