ब्रेकिंग न्यूज... युवा नेते कै.सुनील कांबळे खून प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी) महूद ता. सांगोला येथील मृत सुनील कांबळे यांच्या खूनप्रकरणी कोठडीतील आरोपी ऋषीकेश उर्फ गोट्या भिमराव शिरतोडे, योगेश मधुकर काटे व
सोनु उर्फ अनिल यशवंत चव्हाण ( तिघेही रा महूद ता सांगोला ) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवार १९ रोजी तपास अधिकारी यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात हजर केले
असता न्यायाधीश यांनी आरोपींना मंगळवार २३ जुलै पर्यंत पाच दिवस वाढीव कोठडी दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी दिली आहे.
मृत सुनील अनिल कांबळे -३२ या तरुणाचा किरकोळ भांडणाच्या कारणावरून धारदार हत्याराने डोक्यात
मानेवर हातावर वार करून खून केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील ऋषिकेश उर्फ गोट्या भीमराव शिरतोडे ,
शुभम उर्फ आबा भागवत जाधव सोनू उर्फ अनिल यशवंत चव्हाण, योगेश मधुकर काटे (सर्वजण रा. महूद ता. सांगोला ) या चार आरोपींना अटक केली होती
चौघांपैकी आरोपी ऋषिकेश उर्फ गोट्या शिरतोडे, सोनू उर्फ अनिल चव्हाण व योगेश काटे यांना शुक्रवारी पंढरपुर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता
न्यायालयाने तिन्ही आरोपींना शुक्रवार १९ जुलै पर्यत ८ दिवस पोलीस कोठडी दिली होती तर शुभम उर्फ आबा भागवत जाधव या अल्पवयीन आरोपीची सोलापूर येथील बाल सुधार गृहात रवानगी केली आहे.
दरम्यान अटकेतील तीन्ही आरोपीच्या पोलीस कोठडीची शुक्रवार १९ रोजी मुदत संपल्याने तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी तिघांना पंढरपूर येथील सत्र न्यायालयात हजर केले
असता न्यायालयाने आरोपींना गुन्ह्याच्या पुढील सखोल तपास करणेकामी मंगळवार २३ जुलै पर्यंत पाच दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.
0 Comments