google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील देशपांडे प्लॉट मधील ड्रेनेज दुरुस्त करा:- अशोक कामटे संघटना बेशिस्त पार्किंगमुळे रहिवाशी त्रस्त

Breaking News

सांगोला शहरातील देशपांडे प्लॉट मधील ड्रेनेज दुरुस्त करा:- अशोक कामटे संघटना बेशिस्त पार्किंगमुळे रहिवाशी त्रस्त

सांगोला शहरातील देशपांडे प्लॉट मधील ड्रेनेज दुरुस्त करा:- अशोक कामटे संघटना बेशिस्त पार्किंगमुळे रहिवाशी त्रस्त



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला शहरातील भोपळे रोड नजीक देशपांडे प्लॉट परिसरातील ड्रेनेज दुरुस्त व नियमित स्वच्छता करावी, जिजामाता उद्यानासमोर  अंतर्गत मार्गात वाहने रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले

 असतात या समस्यांचे निराकरण करावे  या मागणीचे निवेदन मार्च महिन्यामध्ये मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे देण्यात आले होते.

चार महिने झाले तरी अद्याप नगरपालिकेने ना तुंबलेल्या गटारी स्वच्छ केल्या, वाहत्या केल्या नाही त्यामूळे येथे रोगराई, डासांचे प्रमाण वाढलेले आहे,यापैकी कोणतीही कार्यवाही प्रशासनाने अद्यापपर्यंत गांभीर्याने केलेली नाही

 त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.तसेच या रस्त्यालगत असणाऱ्या दवाखान्यांमध्ये अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक हे वाहन घेऊन येतात

 संबंधिताचे वाहन हे रस्त्यातच दांडगाइने कायमस्वरूपी अतिक्रमण करून बेशिस्तपणे लावल्यामुळे या भागातील रहिवाशांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे .

याबाबत संबंधित दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा पार्किंगचा प्रश्न सोडविणे , ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे त्यामुळे दैनंदिन येथील नागरिकांत वाद होत आहेत. 

वीस फुटाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी ,चार चाकी वाहने लावल्याने पूर्ण रस्ताच व्यापला जात आहे त्यामुळे इतर लोकांना रहदारी करिता रस्ताच उपलब्ध होत नाही, याचा कायम त्रास दैनंदिन होत आहे .

महात्मा फुले चौकापासून पश्चिमेस जुन्या मिरज रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे पाणी व पावसाचे पाणी मधोमध साठत असल्याने येथील रहिवाशी, व्यावसायिक त्रस्त आहेत त्यामुळे अघोषित हा रस्ता बंद असल्याचे सध्यातरी दिसते

 तरी या समस्ये प्रश्र्नी सांगोल्याचे मुख्याधिकारी यांनी वेळ देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यापूर्वीही व आत्ताही येथील रहिवाशांनी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेकडे केली आहे. 

अन्यथा येथील रहिवाशी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तरी नगरपालिकेने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी स्मरणपत्राद्वारे मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments