सोलापुरात मध्यरात्री तरुणासोबत घडलं भयकर कांड, अज्ञाताने डोक्यात दगड घालून केली हत्या
सोलापुरात तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलपुरात २६ वर्षीय तरुणाची अज्ञात कारणाने डोक्यात
दगड घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री ही हत्येची घटना घडली आहे.
जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात ही घटना घडली आहे. या हत्येच्या घटनेने सोलापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात मध्यरात्री हत्येची घटना घडली आहे. या परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. विनायक हाके असे मृत तरुणाचे नाव आहे.
विनायक हाके हा मूळचा मोहोळचा रहिवाशी आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापुरात त्याच्या आजीकडे आला होता. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तरुणाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मोहोळमध्ये राहणारा विनायक त्याच्या मूळगावी सोलापूरला आजीकडे आला होता. आजीकडे आलेल्या विनायकची रविवारी मध्यरात्री अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात घडलेल्या भयंकर घटनेने परिसरात एकच उडाली आहे.
विनायकच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. विनायकचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पंचनाम्यासाठी रवाना करण्यात आला आहे.
सध्या पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांकडून नव्या भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद होणार आहे.
मुलुंडमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या
मुंबईच्या मुलुंड पश्चिम भागात एका १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना शनिवारी घडली. गुटखा खाण्यास पैसे दिले नाही म्हणून त्याचा वाद झाला होता.
हुसेन ताज हुसैन खान असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
0 Comments