google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे यांच्यावर निलंबनाची कारवाई शेकापने प्रकरण धरले होते लावून.. -

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे यांच्यावर निलंबनाची कारवाई शेकापने प्रकरण धरले होते लावून.. -

ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे यांच्यावर निलंबनाची कारवाई शेकापने प्रकरण धरले होते लावून.. -


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सांगोला येथील उपअभियंता सुरेश कमळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारी (ता. १८) त्यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कार्यकाळात गाजलेल्या जलजीवन मिशनच्या प्रकरणात

 सांगोल्याचे उपअभियंता कमळे हे वादग्रस्त ठरले होते. शेकापने हे प्रकरण लावून धरले होते. कमळे यांच्यावर तांत्रिक अभियंता अमर कांबळे यांच्या नावावर जलजीवन मिशन 

अंतर्गत कामाचे कार्यारंभ आदेश काढणे, जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण न करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांना गैरहजर राहणे 

हा ठपका ठेवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी १४ मे रोजी त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव प्रस्तावित केला होता.

तसेच २ जुलै रोजी सीईओ आव्हाळे यांनी कमळे यांना तत्काळ निलंबित करण्याची शिफारस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नियम चार च्या पोट नियम-१- अ मधील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य

 सचिव अभिषेक कृष्णा यांनी उप अभियंता कमळे याचे निलंबन केले आहे. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पाठविले आहे.

Post a Comment

0 Comments