Breaking News

गौरी-गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका धारकांना मिळणार आनंदाचा शिधा - आमदार शहाजीबापू पाटील

गौरी-गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका धारकांना मिळणार आनंदाचा शिधा - आमदार शहाजीबापू पाटील


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात

 गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील नागरिकांचा गणेशोत्सव गोड होणार आहे. 

गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर व १ लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा

 शिधा १०० रुपयांत देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. 

राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ०८६ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार

 असून यासाठी ५६२ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली असल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगितले 

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारने दिवाळी, गुढीपाडवा, 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती उत्सव, श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधापत्रिका १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

 सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभल्याने त्याच धर्तीवर यंदा गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चनाडाळ,

 १ किलो साखर व १ लिटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा १०० रुपयांत शिधापत्रिका धारकांना देण्यात येणार आहे. 

      राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ०८६ शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. याबाबत ⁠राज्य सरकारकडून शासनादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 ⁠आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.

 यासाठी सरकारकडून आनंदाचा शिधा निविदा प्रक्रिया आणि ५६२ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

 सणासुदीच्या काळात गौरी-गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार

 असल्याने गणेशोत्सव गोड होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments