बिग ब्रेकिंग! अजितदादांनी केला राजकीय भूकंप स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच पक्षच विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत.
तर दुसरीकडे मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निवडणुका कधी होणार,
असा प्रश्न पडला आहे. याच निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा
अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली आज कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्यात अजितदादा यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार
असल्याचे स्पष्ट केले आहे. अजितदादा म्हणाले की, उद्या नगर दौरा असून चार ठिकाणी कार्यक्रम आहे. अनेक जण पक्षात आले आहेत,
त्यांचे मी स्वागत करतो. आगामी विधानसभा निवडणूक अंदाजे ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात होईल.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत,
अशी घोषणाच अजितदादा यांनी कार्यकर्त्यांसमोर केली. त्यामुळे, अजितदादा यांच्या वक्तव्याने महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 Comments