google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात खळबळजनक घटना..बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

Breaking News

सांगोल्यात खळबळजनक घटना..बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

सांगोल्यात खळबळजनक घटना..बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला(प्रतिनिधी)-सांगोला शहरातील मिरज रोडवरील स्टेट ऑफ इंडीया बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असून शहरातील एटीएम

 मशीनच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.त्याचप्रमाणे कुलुप कोयडा उचकटुन घरात प्रवेश करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने पळवून नेली असल्याची घटना 

15 जुलै रोजी रात्री सांगोला महाविद्यालयाजवळ घडली. चोरीची फिर्याद आरबाज शेख यांनी सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 जुलै रोजी नेहमी प्रमाणे घरातील सर्वजन जेवण करून रात्री 10.30 वा. 

चे सुमारास झोपी गेले होती. फिर्यादी आरबाज शेख हे सूत गिरणी सांगोला येथे दुपारी 4 वाजता कामास गेले होते. 

रात्री 12.30 वा. दरम्यान फिर्यादी हे घरी आले होते. त्यानंतर पहाटे 2.45 वाजता फिर्यादी यांचे वडील काशिम शेख यांनी फिर्यादी यांना फोन करुन सांगितले की,

 दरवाजास बाहेरून कोणीतरी कड़ी लावली आहे. तु खाली ये सांगिल्याने फिर्यादी आरबाज यांनी खाली येऊन पाहिल्यावर आई वडील झोपलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली होती, 

ती कड़ी काढल्यानंतर ते बाहेर आले त्यानंतर शेजारी असलेल्या खोलाकडे पाहिले असता त्या खोलीस लावलेले कुलुप हे कडीतुन कट केलेले होते.

 त्या खोलीचा दरवाजा उघडुन आत जावुन पाहिले असता घरातील पत्र्याचे पेटीचे लहान कुलुप तोडलेले व पेटीतील समान अस्ताव्यस्थ पडले होते.

 पेटीमध्ये ठेवलेली आईची 21,500 रुपये किंमतीची सोन्याची पावणतोळा वजनाची बोरमाळ व रोख रक्कम 6500 रुपये ही चोरुन नेली होती.

त्याचप्रमाणे मिरज रोड येथे असणारे स्टेट ऑफ इंडीया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु एटीएममधुन काहीही रक्कम चोरीस गेली नाही.

 तसेघ फिनिक्स डायग्नोेस्टीक सेंटर कडलास नाका सांगोला येथील सेंटरचे कुलूप तोडले आहे. परंतु त्याचे ही काही समान चोरीस गेले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments