मोठी बातमी..बार्टी तर्फे संविधान दिंडीचे वेळापूर नगरीमध्ये उद्घघाटन पर कार्यक्रम संपन्न.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर यावर्षी ही
संविधान दिंडी चे वेळापूर नगरीमध्ये मा. धैर्यशील मोहिते पाटील खासदार,माढा सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती
श्री.उत्तम जानकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व वेळापूर सरपंच श्रीरजनीश बनसोडे. मिलिंद सरतापे या सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये आयोजन करण्यात आले .
महाराष्ट्रातील आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान
आषाढी वारीस सुरुवात झाली असून देहू व आळंदीत राज्याच्या कानाकोपन्यातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत.
जगदुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बार्टीचा संविधान रथ ही संविधाचा प्रचार-
प्रसार करण्यास सज्ज झाले आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
बार्टीकडून पालखी सोहळ्यात संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानविषयक प्रबोधन करण्यासाठी संविधान रथ सजविण्यात आलेले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन
व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी,
आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिडीचा हेतू आहे.
आज वेळापूर येथे संविधान शाहीर जलसा कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी संविधान
सारखे उपक्रम बार्टीने हाती घेतल्यामुळे बार्टी संस्थेचे विशेष आभार मानले व असे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत सूचित केले.
तसेच श्री उत्तम जानकर यांनी देखील संविधानाची जनजागृती करणे किती गरज आहे असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले व बार्टी संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री. सुनील वारे महासंचालक बार्टी तसेच निबंधक इंदिरा अस्वार,
विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी व प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे ,समतादूत किरण वाघमारे,
मुकुंद लोंढे, जोती ओव्हाळ केमेरामन राहुल कवडे या सर्वांनी हा कार्यक्रम अत्यंत सुंदर त्याने नियोजन करून कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
0 Comments