google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता सांगोला पिपल्स अर्बन को- ऑप- क्रेडिट सोसायटी लि. सांगोला ची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Breaking News

राजमाता सांगोला पिपल्स अर्बन को- ऑप- क्रेडिट सोसायटी लि. सांगोला ची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

राजमाता सांगोला पिपल्स अर्बन को- ऑप- क्रेडिट सोसायटी लि. सांगोला ची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  संपन्न



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी:( दशरथ बाबर) राजमाता सांगोला पिपल्स अर्बन को- ऑप- क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेची  6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी

 सकाळी 11:30 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन तायाप्पा माने हे होते. संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन ,

 संचालक व सभासदांचे स्वागत बँकेचे क्लार्क अनिल जानकर व राजू मुलाणी यांनी केले. सर्वप्रथम संस्थेचे सचिव संतोष मदने यांनी सांगितले की, संस्थेची स्थापना 20 ऑक्टोबर 2018 रोजी झाली आहे .

संस्थेच्या 6 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अहवाल वाचन व वार्षिक नफा - तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक ,तेरिजपत्रक मांडले व संस्थेची वार्षिक उलाढाल चांगली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी चेअरमन तायाप्पा माने यांनी उपस्थितांना  बँकेच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी चेअरमन तायाप्पा माने, 

व्हाईस चेअरमन नितीन देशमुख, संचालक तानाजी सरगर, हणमंत चव्हाण, सिताराम मदने, यांच्यासह सभासदांमध्ये मेजर आनंदा व्हटे, देविदास गावडे ,दत्तात्रय घाडगे ,

करीम मुलाणी,संजय लाटणे, सचिन कचरे, पांडुरंग कचरे ,ज्ञानेश्वर गाडेकर, रमेश कोकरे, बाळासो सातपुते, रामचंद्र गाडेकर, 

आनंदा गावडे यांची उपस्थिती होती. सभेच्या समारोपप्रसंगी सचिव संतोष मदने यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments