google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! शाळेला जाताना गडबडीत खोकल्याचे औषध समजून किटनाशक पिल्याने 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

Breaking News

धक्कादायक! शाळेला जाताना गडबडीत खोकल्याचे औषध समजून किटनाशक पिल्याने 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! शाळेला जाताना गडबडीत खोकल्याचे औषध समजून किटनाशक पिल्याने 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत 


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली.

 शाळेला जाताना गडबडीत औषध समजून कीटकनाशक प्राशन केल्याने अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत झाला.

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे गावामध्ये ही घटना घडली. वेदांत अशोक पाटील (वय 11) असे मृत शाळकरी मुलाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वेदांतने शाळेला जात असताना गडबडीत खोकल्याचं

 औषध समजून कीटकनाशक प्याला होता. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने

कोल्हापुरात तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल.

 मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments