माळशिरस तालुक्यातील साळमुख येथे होलार समाजाचा
भव्य राज्यव्यापी मेळावा संपन्न होलार समाजाची मुलुख मैदानी तोफ होलार समाज विचारवंत प्रा शहाजी पारसे सर
( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मौजे कोळेगाव माळशिरस तालुक्यातील साळमुख मधील राजीव मंगल कार्यालयामध्ये होलार समाजाचा आहे वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला
या मेळाव्याचे उद्घाटक उद्योगपती समाजभूषण आबासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्याचे अध्यक्षस्थानी
मा उद्योगपती प्रवीण जी करडे साहेब या मेळाव्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होलार समाजाचे नेते माननीय पांडुरंग आयवळे
साहेब माननीय श्री शिक्षण महर्षी प्रा सी डी ढोबळे मा स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शिवाजी जावीर माळशिरस तालुक्याचे युवा नेते लालासाहेब गेजगे
आटपाडीचे नेते सुखदेवराव गुलिग मा कुमारजी लोंढे मा नारायणरावजी जावीर मा सौदागर खांडेकर मा सविता आयवळे सौ मनीषा आयवळे मॅडम मोहनराव केंगार मा रामचंद्र आयवळे सर खवासपूर
प्रा रामचंद्र पारसे मा संतोष हेगडे मा तानाजीराव भंडगे मा शामराव पारसे मा चरण दादा बंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
होलार समाजाच्या राज्यव्यापी वधू-वर पालक परिचय मेळाव्याचा उद्घाटन सोहळा शिव फुले शाहू आंबेडकर
अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर संत गाडगेबाबा संत रोहिदास महाराज समाजभूषण वि दा आयवळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना होलार समाजाची मुलुख मैदानी तोफ समाजाचे विचारवंत महाराष्ट्र राज्य होलार समाज विशेष कृती दल
समितीचे संस्थापक प्राध्यापक शहाजी पारसे सर यांनी प्रास्ताविक करून समाजातल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक विषयावरती
अगदी प्रभावी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून समाजाची मने जिंकली अगदी सुरेख नेटके देखणे आलिशान अशा पद्धतीच्या नियोजनाची समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने कौतुक केले
होलार समाजातील जमलेल्या प्रत्येक बांधवांनी असा संकल्प केला असे उपक्रम समाजामध्ये वारंवार राबवणे काळाची गरज आहे आज या वधू-वर पालक परिचय मेळाव्यासाठी राज्यातून
सांगली सातारा, सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई धाराशिव बारामती इंदापूर अंधेरी कल्याण भिवंडी ठाणे विदर्भ वाशी पनवेल कामोठे माळशिरस आटपाडी सांगोला पंढरपूर फलटण मंगळवेढा माढा करमाळा
आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांचा जनसागर उसळलेला होता महिलांची उपस्थिती लक्षणीय होती
जवळजवळ या मेळाव्यामध्ये 200 वधू वर बंधू भगिनींनी पालकांनी आपल्या नावाची नोंदणी करून आपला परिचय करून दिलेला आहे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे
या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेला प्रत्येक समाजबांधवा क्लास वन क्लास टू उच्चशिक्षित शिक्षित सर्वगुणसंपन्न असा समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता
समाजामध्ये चांगले विचाराच्या कार्याला सुरुवात झालेली आहे समाज एकजूट होत आहे समाजामध्ये समाजामध्ये चांगले नेतृत्व आहे याची जाणीव समाज बांधवांना होऊ लागलेली आहे
या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक समाज बांधवांच्या चेहऱ्यावरचे एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून जवळजवळ बऱ्याच मुला-मुलीचे लग्न
जमवण्याचा जो आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला तो यशस्वी सुद्धा झालेला आहे या कार्यक्रमांमध्ये लक्षणे महिलांच्या उपस्थिती वरून आपल्या समाज बांधवांच्या मनामध्ये
एक विचार निर्माण झाला की आपल्या महिला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे समाज बांधवांमध्ये आनंद निर्माण झालेला पाहायला मिळाला
उत्कृष्ट स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती वजनाचा आस्वाद घेतल्याच्या नंतर समाज बांधवांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
गेले की एवढं सुंदर चांगलं स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आमचं मन सुद्धा प्रसन्न झालं
येणाऱ्या काळामध्ये होलार समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय बाबीचा विचार करीत असताना समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी एका विचाराने
एकत्र येऊन समाजाची उन्नती प्रगती करण्याचा संकल्प करूया आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या होलार समाजाला नक्कीच कोणत्याही पक्षाने संधी नाही दिली
तरी या निवडणुकीमध्ये आपल्या होलार समाजाची ताकद दाखवून देण्याचा विचार सुद्धा या मेळाव्यामध्ये समाज बांधवांनी व्यक्त केलेला आहे
या मेळाव्यामुळे समाजातल्या ग्रामीण भागातल्या बऱ्याच मुला-मुलींना असे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या समाजबांधवांमध्ये आनंद निर्माण झालेला असून अशा
उपक्रमामुळे समाजातील बांधवांची गैरसोय दूर होईल विभाग वाईज कार्यक्रम घेतल्यामुळे समाजातील बांधवांसाठी हे खूप महत्त्वाचे ठरेल समाज बांधवाला असे
व्यासपीठ निर्माण करून द्यावेत आणि असे कार्यक्रम वारंवार प्रत्येक भागामध्ये घेऊन समाज बांधवांच्या अडी अडचणीचा विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न होईल अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या
आटपाडी तालुक्यातील समाज नेते पांडुरंग आयवळे यांनी आटपाडी तालुक्यांमध्ये होलार समाज वधु वर पालक परिचय मेळावा
घेण्यासाठी तयारी सुरू करण्याचा संकल्प केला मान तालुक्यामध्ये सुद्धा लवकरच वधु वर पालक परिचय मेळावा घेण्याचा विचार फायनल केलेला आहे
महाराष्ट्र राज्य होलार समाज विशेष कृती दल समितीच्या वतीने उपक्रम महाराष्ट्रभर घेऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करू असे वचन आश्वासन प्राध्यापक शहाजी पारसे सर यांनी दिले आहे
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामभाऊ ढोबळे नवनाथ गुळीग बिरा फारसे धनाजी पारसे मायाप्पा तुपे सोमनाथ वाघमारे लालासाहेब गेजगे मोहन पारसे मोहन केंगार शिवाजी पारसे पांडुरंग पारशे
सर्व विष्णू पारशे सर दादासाहेब पारसे या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला कार्यक्रमाचे आभार रामभाऊ ढोबळे यांनी मानले
कार्यक्रमामधील काही क्षणचित्रे
नेटके सुरेख नियोजनाचे कौतुक
महिला वर्गांची उपस्थिती लक्षणीय
होलार समाजाचा आमदार झालाच पाहिजे
होलार समाजाच्या साठी सांस्कृतिक कलाभवन निर्मिती झाली पाहिजे
माळशिरस तालुक्यामध्ये होलार समाजाने विधानसभा निवडणूक लढवावी
वधू-वरांनी आम्हाला सरकारी नोकरीवाला हवा अशी भावना व्यक्त केली
काही मुलींनी आम्हाला शेतकरी नवरा हवा भविष्यात शेतीच टिकेल असा विचार व्यक्त केला
होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झालीच पाहिजे
होलार समाजासाठी कलावंत पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे
कार्यक्रमाचे ठिकाणी प्रसन्नता शालिनता नम्रता विवेक याचे दर्शन घडले
सुंदर स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था
समाजबांधवांचे चेहऱ्यावरती आनंदाचे वातावरण
प्राध्यापक शहाजी पारसे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है याची चर्चा
0 Comments