google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सफेद शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याचा शासन निर्णय.यामुळे सफेद शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार !

Breaking News

मोठी बातमी..सफेद शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याचा शासन निर्णय.यामुळे सफेद शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार !

मोठी बातमी..सफेद शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याचा शासन निर्णय.


यामुळे सफेद शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार !

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व 

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला 

असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

२. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.

 करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

Post a Comment

0 Comments