ब्रेकिंग न्यूज...शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तात्काळ राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दिपकआबांनी या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
ना. विखे पाटील यांना केली यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या आगामी बैठकीत यावर तोडगा काढण्याची आश्वासन दिले.
राज्यभर दुधाचे दर कमालीचे घसरल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. अशावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी राज्यात सर्वप्रथम
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली होती. पशुपालक शेतकऱ्यांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच राज्य सरकारने पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या अनुदानापासून वंचित असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही आता राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्र्वस्त केल्याने सांगोला तालुक्यातील पशुपालक शेतकरी सुखावला आहे.
0 Comments