वाई अक्कलकोट एसटीचे उडतारेत उत्साहांत स्वागत, बहुसंख्येने ग्रामस्थांची उपस्थिती, खंडाळ्याच्या आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी घेतला पुढाकार,
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज अनुंजा कारखेले मॅडम (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. वाई अक्कलकोट ही बस सेवा सुरू केली होती.
सुरज सुतार आणि खंडाळ्याच्या आगार व्यवस्थापक सौ: नीता जगताप मॅडम यांच्या प्रयत्नाने गाडीला उडतारे हा थांबा दिला आहे उडतारे ग्रामस्थांच्या वतीने गाडीचे पूजन स्वागत करण्यात आले,
यावेळी बस चालक वाहक व सौ: नीता जगताप मॅडम यांचा देखील उडतारे ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला आहे. यावेळी उडतारे व पंचक्रोशींतील गावांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा
असे आवाहन देखील सौ: निता जगताप मॅडम यांनी केले आहे. या गाडीचा मार्ग वाई पाचवड उडतारे सातारा कोरेगाव पुसेगांव गोंदवले म्हसवड पंढरपूर मोहोळे सोलापूर अक्कलकोट असा आहे.
त्यामुळे भाविकांना कोणत्याही देवस्थानला जाणाऱ्या भाविकांना उत्तम सोय करण्यात आली आहे. तसेच या बसला उडतारे ते अक्कलकोट फुल तिकीट 435 रुपये आणि महिलांसाठी अर्ध तिकीट 225 रुपये आहे.
यावेळी खंडाळा आगारांच्या सौ: नीता जगताप व्यवस्थापक यांनी सातारा राज्य परिवहन विभागांच्या विभागीय नियंत्रक श्री. रोहन पलंगे साहेब विभागीय वाहतूक अधिकारी सौ: ज्योती गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनात
यावेळी विनोद जगताप शिवाजी मोहिते सुरज सुतार संतोष जगताप संदीप चव्हाण विकास चव्हाण संपत पवार योगेश बाबर प्रदीप बाबर निळकंठ शेडगे योगेश फरांदे यांच्यासह आदीं ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments