ब्रेकिंग न्यूज...त्या, तरुणाचा छेडछाडीतून खून नऊ जणांना अटक : अवघ्या चार तासांत आरोपींना ठोकल्या, बोरगांव पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज अनुजा कारखेले मॅडम (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यांतील बोरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अज्ञात इसमांनी
किरकोळ करणांतून करंजाशींतील एका युवकांच्या शरीरांवर गंभीर मारहाण करीत त्याचा खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यांतील नागठाणे येथे रविवारी सायंकाळी घडली होती या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचा
सखोल तपास करीत अवघ्या चार तासांच्या आत नऊ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये ओंकार हनुमंत पन्हाळकर (वय 20) निखिल मारुती पवार (वय 20) रोहित मारुती पवार (वय 21)
आदित्य नामदेव पवार (वय 18) साहिल जयसिंग पिंपळे (वय 19 ) तेजस सचिन पन्हाळकर (व 21) कुमार एकनाथ पन्हाळकर (वय 22) देवेंद्र बनाजी गाडगे (वय 28) अशी आरोपींची नावे आहेत.
यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. सदर आरोपी हे कराड,पाटण,सातारा तालुक्यांतील आहेत, सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली
स.पो.नि. पृथ्वीराज ताटे व सुधीर पाटील यांचे एक पथक तयार करून तपासकामी बोरगांव पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते, सदर पथकांने नागठाणे ते जावुन खुनांच्या घटनास्थळी भेट दिली,
तसेच परिस्थितीची माहिती घेत बोरगांव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांच्यासमवेत सदर गुन्ह्याचा तपास केला, सदरचा हा गुन्हा छेडछाडीच्या संशयावरुन केला असल्यांची माहिती पथकांस मिळाली
अशा प्रकारे स्थानिक शाखेकडील अधिकारी, कर्मचारी व बोरगांव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर कुणाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासांच्या आत उघडकीस आणला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासी कामी सहभागी स्थानिक गुन्हे शाखा,बोरगांव पोलीस ठाणेकडील तसेच सर्व अधिकारी पोलीस अंमलदारांचे स्टाफ यांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments