google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... धायटी ग्रामपंचायत निधी, स्वखर्चातून धायटीतील पाणी टंचाई दूर सरपंच स्वाती येडगे यांचा पुढाकार; तब्बल ६२ फूट विहिरीची खोदाई, नळांद्वारे घराघरात जाणार पाणी

Breaking News

मोठी बातमी... धायटी ग्रामपंचायत निधी, स्वखर्चातून धायटीतील पाणी टंचाई दूर सरपंच स्वाती येडगे यांचा पुढाकार; तब्बल ६२ फूट विहिरीची खोदाई, नळांद्वारे घराघरात जाणार पाणी

मोठी बातमी... धायटी ग्रामपंचायत निधी, स्वखर्चातून धायटीतील पाणी टंचाई दूर


सरपंच स्वाती येडगे यांचा पुढाकार; तब्बल ६२ फूट विहिरीची खोदाई, नळांद्वारे घराघरात जाणार पाणी

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला तालुक्यातील धायटी गावच्या सरपंच स्वाती नवनाथ येडगे यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे.

 ग्रामस्थांची कायमची पाण्याची व्यवस्था केल्यामुळे धायटी गावातील नागरिकांतून . समाधान व्यक्त होत आहे.

धायटी गावातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येडगे यांनी विहीर खोदायचा निर्णय घेतला. शासनाच्या माध्यम तून असणाऱ्या निकषाप्रमाणे छोटीशी विहीर खोदन गावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नव्हता 

म्हणून धायटी ग्राम पंचायतीचा १५ वा वित्त आयोगातून इस्टिमेट ३० फुटाचे असताना, स्वतः सरपंच स्वाती नवनाथ येडगे यांनी स्वखर्चाने ३२ फूट जादा खोलाई करून एकूण ६२ फूट विहीर गावातल्या जाधव वस्ती येथे खोदण्यात आली.

 यामध्ये ५५ फूट खोल पाणीसाठादेखील झाला आहे. हे पाणी टाकीमध्ये सोडून घराघरांमध्ये पोहचवण्यात येणार आहे. धायटी ग्रामपंचायतीचा १५ वा वित्त आयोगातून

 ३० फूट आणि सरपंच स्वाती येडगे यांनी स्वखर्चातून ३२ फूट अशी एकूण ६२ फूट खोदण्यात आलेल्या विहिरीमुळे धायटी ग्रामस्थांना उन्हाळ्यातल्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली आहे.

अन्य ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा…….जिल्ह्यात पर्जन्यमान कमी होत असल्याने पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि पदाधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे.

 पायटी ग्रामपंचायत आणि सरपंच स्वाती येडगे यांचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने कामाची कार्यवाही करावी. यामुळे पाण्याबाबत गावे ही स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा आणि घागरी उतरण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments