google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पर्यावरण संरक्षणासाठी आपला वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करावा. विकास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आनंदराव बाबर व मुख्याध्यापक, प्राचार्य के. डी .बाबर यांचे आवाहन

Breaking News

पर्यावरण संरक्षणासाठी आपला वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करावा. विकास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आनंदराव बाबर व मुख्याध्यापक, प्राचार्य के. डी .बाबर यांचे आवाहन

पर्यावरण संरक्षणासाठी आपला वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करावा.


विकास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आनंदराव बाबर व मुख्याध्यापक, प्राचार्य के. डी .बाबर यांचे आवाहन

सांगोला/ प्रतिनिधी ( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज दशरथ बाबर) : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. याचा परिणाम पर्यावरणावर झाला असून अल्प पर्जन्यमान व वाढते तापमान या घटकावर झाला आहे .

यातून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या गावच्या परिसरात किमान पाच झाडे लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. 

"झाडे लावा, झाडे जगवा "ही एक चळवळ उभी राहिली पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे संरक्षण करण्यात यशस्वी होऊ. 

अन्यथा उन्हाळ्याच्या दिवसात काय ही उष्णता ? किती तापमान ?असे प्रश्न विचारण्यापेक्षा यावरती उपाय म्हणून पर्यावरण संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वृक्ष लागवड हा एकमेव उपाय आहे.

 त्यातून निसर्गाचे संवर्धन होईल व सजीवांसाठी त्याचा शंभर टक्के उपयोग होईल . पर्यायाने सजीव सृष्टीचे अस्तित्व कायम राहील.

 अन्यथा फार मोठ्या गंभीर स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. हे कोणीच नाकारू शकत नाही. याकरिता चोपडी गावातील व्यक्तींनी आपला वाढदिवस साजरा करीत असताना 

 वाढदिवसासाठी अनाठाई खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून वृक्षारोपण केले तर निश्चितपणे त्याचा फायदा भविष्यामध्ये सर्वांनाच होणार आहे. चोपडी येथील विकास एज्युकेशन सोसायटीचे

 अध्यक्ष डॉ. आनंदराव बाबर व मुख्याध्यापक, प्राचार्य के. डी. बाबर यांनी गावातील व्यक्तींना वाढदिवस साजरा करताना बाळासाहेब देसाई विद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करून आपला वाढदिवस साजरा करावा.

 वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्तीचा संस्थेच्या वतीने सन्मान केला जाईल . प्रशालेप्रती आपले असलेले प्रेम व नाते अतूट राहील .

 वृक्षारोपणाने आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती मुख्याध्यापक, प्राचार्य के. डी.बाबर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments