खळबळजनक घटना...पाळीव कुत्र्याला आईनं मारलं; रागात 14 वर्षांच्या मुलाने आयुष्यच संपवलं
घरात पाळलेल्या कुत्र्याने घरात घाण केल्याचा राग आल्याने आईने कुत्र्याला मारलं. तसंच यामुळे मित्रांसोबत बसलेल्या मुलावर आई रागवली. यामुळे 14 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील मिल कॉर्नर भागात हा प्रकार घडला. राजवीर राहुल गडकर असं मृत मुलाचं नाव आहे.
राजवीर यानी काही दिवसांपूर्वी एक कुत्रा पाळला होता. त्या पाळलेल्या कुत्र्याने घरात घाण केली. हा प्रकार राजवीरच्या आईच्या निदर्शनास आल्याने आईने कुत्र्याला मारलं.
यावेळी राजवीर हा घराबाहेर मित्रांसोबत बसला होता. त्याच्यावरही आई रागावली. याचा राग मनात धरून राजवीर याने बेडरूममध्ये जात गळफास घेतला.
हा प्रकार त्याच्या आई आणि शेजारच्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ राजवीरला लटकलेल्या अवस्थेतून खाली उतरवत बेशुध्दावस्थेतच घाटी रूग्णालयात दाखल केलं.
तेथील डॉक्टरांनी राजवीरला तपासून मृत घोषित केलं. या घटनेप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
राजवीर नववीचा विद्यार्थी
राजवीर हा ज्युबली पार्क शाळेतील विद्यार्थी होता. तो नुकताच आठवी उतीर्ण होऊन नववीच्या वर्गात गेला होता. राजवीरचे वडील अंध असून त्याची आई किराणा दुकान चालवते.
मागील काही महिन्यांपासून राजवीरच्या आईला ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. राजवीर हा एकुलता एक असून त्याने हे टोकाचं पाउल उचललं, त्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


0 Comments