महाराष्ट्र हादरला! शरीर संबंध का ठेऊ देत नाही, म्हणून तिथेच गळा आवळून खून
राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. किरकोळ कारणावरून खून, दरोडा या घटना वाढल्या आहेत.
दरम्यान पुण्यात देहू येथे एक पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून
संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली. विशेष म्हणजे दोघांचा संसार सुरू होऊन केवळ दोनच महिने झाले होते.
या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी
आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
तर जयदीप अर्जुन यादव (वय २९, रा. देहूगाव, मूळ रा. चिखलगोळ, जि. सांगली) असे आरोपी पतीचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून
व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा व जयदीप यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. प्रतीक्षा हिचे शिक्षण एमएसस्सीपर्यंत तर जयदीप याने अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतली आहे.
जयदीप हा एका खासगी कंपनीत नोकरीला असून ते सात दिवसांपूर्वी देहूगाव येथे राहण्यासाठी आले होते.
सुरुवातीला दोघांचेही चांगले चालले होते. मात्र, काही दिवसांनी प्रतीक्षा ही जयदीपला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती.
यामुळे जयदीपला तिच्यावर संशय येत होता. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचादेखील संशय त्याला होता. याच संशयातून त्याने प्रतीक्षाला गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला नेले.
या ठिकाणी त्याने तिला शरीर संबंध का ठेऊ देत नाही, याबाबत जाब विचारला. मात्र, दोघांत भांडण झाल्याने संतापलेल्या जयदीपने तिचा तिथेच गळा आवळून खून केला.
0 Comments