धक्कादायक..'इलेक्ट्रिक शॉक दिला, जीभ कापली...' अभिनेत्यानं गाठला क्रूरतेचा कळस
प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा सध्या चर्चेत आहे. त्याला खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या आठवड्यात त्याच्याविषयी ही धक्कादायक माहिती समोर आली. दर्शन थुगुदीपा याच्यावर रेणुका स्वामीचा खून केल्याचा आरोप आहे.
दर्शनबरोबर आणखी काही जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं. यात त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेत्री पवित्रा गौडा हिला देखील ताब्यात घेतलं आहे.
यापैकी एकानं दर्शननं खुन केल्याचं कबूल केलं आहे. अशातच आता रेणुका स्वामीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यात खुनाविषयी धक्कादायक खुलासे झाले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका स्वामी हा दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज पाठवायचा. याच रागानं त्यांनी रेणुका स्वामीची हत्या केली.
हत्या केल्यानंतर मृतदेह बंगळुरूच्या कामाक्षीपाल्या येथील कालव्यात फेकून दिला. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
रेणुका स्वामीने अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लिल मेसेज पाठवले होते. त्याने 7 जून रोजी पवित्राला त्याच्या प्रायव्हेट पार्टचा फोटो पाठवला असल्याची माहिती आहे. हेच त्याच्या हत्येचं कारण ठरलं.
दर्शनला ही गोष्ट समजली आणि त्याने रागाच्या भरात रेणुकास्वामीच्या खुनाची सुपारी दिली. पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार, दर्शन हा मारेकऱ्यांच्या सतत संपर्कात होता.
याप्रकरणी पोलिसांनी दर्शन आणि पवित्रासह 17 जणांना अटक केली आहे. आता रेणुकास्वामीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
सोमवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी रेणुकास्वामीला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी केबल कामगार असलेल्या धनराज नावाच्या व्यक्तीला नुकतीच अटक केली.
तसंच रेणुकास्वामीच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने जाळल्याच्या खुणा आढळल्या होत्या. एवढंच नाही तर त्याचं नाक, जीभ कापण्यात आली असून जबड्याला जबर मारहाण करण्यात आली आहे.
यासोबतच त्याच्या शरीरातील अनेक हाडं तुटली होती. त्याच्या कवटीवर फ्रॅक्चरच्या खुणा आढळल्या आहेत. इतक्या क्रूरतेने अभिनेत्यानं रेणुकास्वामीचा खून केला आहे.
0 Comments