प्रेरणादायी!! वासूद - अकोला येथील ग्रामस्थांच्या हाताने केले 322 वृक्षांचे वृक्षारोपण.
ग्रामपंचायत व ग्राम परिवर्तन फाऊंडेशनचा अकोला - वासूद यांचा स्तुत्य उपक्रम
सांगोला:- दुष्काळग्रस्त असणाऱ्या सांगोला तालुक्यातील वासूद-अकोला गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि ग्राम परिवर्तन
फाऊंडेशन अकोला-वासूद यांच्या सहकार्याने "एक कुटुंब एक झाड "या संकल्पनेनुसार वासूद - अकोला गावात 15 व 16 जून रोजी भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
याममद्ये 322 वृक्ष लावून त्या संगोपनाची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली. मुळात सांगोला तालुका हा दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणुन ओळखला जातो.
वृक्षारोपण चळवळ जोम धरू लागली आहे. झाडांचे वृक्षारोपण करून ती झाडे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
माण नदीकाठावर वसलेल्या वासूद - अकोला गावात वृक्षारोपणाचा हा सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला.
ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने वृक्षांची लागवड करून संगोपन करण्याची शपथ घेतली. माण नदीचे पूजन करून सदर वृक्षारोपनास सुरूवात झाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या उपक्रमाने इतर ही गावात वृक्षारोपणाची चळवळ वाढीस लागावी हा आशीर्वाद ग्रामस्थांनी व्यक्त केला. वृक्ष दिंडी वृक्ष माझा श्वास । वृक्ष माझा प्राण
। आन बान शान । वृक्षांसाठी ।। वृक्षांचा सांगावा । प्रेमाचा विसावा ॥ आनंदाचा ठेवा । ... या वचनाप्रमाणे वासुद ग्रामपंचायतीने तीन दिवसात ३२२ वृक्ष लावले.
सदर कार्यक्रमात सरपंच - उपसरपंच, सदस्य, उद्योजक, आजी -माजी सैनिक, वृक्षप्रेमी, शासकिय अधिकारी, शिक्षक, महिला वर्ग सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments