google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी...

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी...

सांगोला तालुक्यातील कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी...


 कोळे / प्रतिनीधी :- बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे.ह्या सणाला 'ईद - उल - जुहा असेही म्हणले जाते. 

बकरी ईद हा सण हा इस्लामिक कॅलेंडर च्या शेवटच्या महिन्यात तीन दिवसांचा सण असतो.

बकरी ईद निमित्त कोळे येथील ईदगाह च्या ठिकाणी सकाळी दहा वाजता नमाज पठण करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही ईद ची नमाज पठण करण्यासाठी कोळे, गौडवाडी, किडेबिसरी, पाचेगाव, व बिहार, उत्तरप्रदेश, बेंगलोर , राजस्थान येथील कामानिमित्त आलेले सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. 

       या बकरी ईद ची नमाज पठण करून मुस्लिम बांधव एकमेकांना भेटुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोळे हे गाव अतिशय संवेदनशील असल्याने सांगोला पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी स.पो.निरिक्षक आदिनाथ खरात,कोष्टी साहेब, वाघमोडे साहेब , पोलिस पाटील प्रविण हातेकर,मदन आलदर हे उपस्थित होते.पोलिस प्रशासनाकडून सर्व उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments