खळबळजनक...सांगोला तालुक्यात मोटार चालू करताना शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
सांगोला : माण नदी विहिरीवरील पाण्याची मोटार विद्युत चालू करताना विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही संभाजी वाघमोडे घटना रविवार १६ जून रोजी सायंकाळी ६च्या सुमारास सावे (जावीर वस्ती) ता. सांगोला येथे घडली.
संभाजी देविदास वाघमोडे (वय ३०, रा.सावेता सांगोला) असे त्या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत
अंकुश श्यामराव वाघमोडे (रा. सावे) यांनी खबर = दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
त्याच्या पाश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. संभाजी हा सरपंच शिवाजी वाघमोडे यांचा पुतण्या आहे.
संभाजी वाघमोडे हा रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्याच्या घरापासून १ किमी अंतरावर असलेल्या सावे
ते देवळे जाणाऱ्या रोडवरील माण नदी विहिरीवरील पाण्याची विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला होता.
मोटार चालू करताना त्यास पेटीचा शॉक लागून बेशुद्ध पडला. ही घटना बिरा गावडे यांनी पाहून भाऊ अंकुश यास संभाजी यास शॉक लागून बेशुद्ध पडल्याचे सांगितले.
बिरा गावडे, अंकुश वाघमोडे यांनी बेशुद्ध अवस्थेत त्यास सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच झाल्याचे सांगितले
0 Comments