google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पती-पत्नीच्या नात्याला काळीमा,पत्नीला लॉजवर बोलवून संपवले, भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह साडूला ठोकल्या बेड्या

Breaking News

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा,पत्नीला लॉजवर बोलवून संपवले, भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह साडूला ठोकल्या बेड्या

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा,पत्नीला लॉजवर बोलवून संपवले, भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह साडूला ठोकल्या बेड्या 


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी. पती-पत्नी हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं असतात. मात्र आता पतीने उचललेलं पाऊलं हे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारं ठरलं आहे. 

पतीने आपल्या पत्नीला भारती विद्यापीठ येथील अश्विनी लॉजवर नेत चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 काजल कृष्णा कदम (वय 27 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती कृष्णा कदम आणि साडूला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

या घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी पतीसह  त्याच्या साडूला देखील तांब्यात घेतलं आहे. पत्नीचा नराधमांने पतीने जीव घेतला आहे. दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा तगुन्हा दाखल केला आहे. 

 पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये न्यायालयात घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचं ठरवले होते. 

यानंतर पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवले होतं. शनिवारी दुपारी दोघंही भारती विद्यापीठ परिसरांतील अश्विनी लॉजवर गेले. तिथे त्यांनी मद्यपान केले. 

नशेत त्यांचा पुन्हा वाद झाला आणि या वादांतून पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. यानंतर पती बाहेरून कुलुप लावून फरार झाला होता.

पती आपल्या मित्रांसोबत मद्यपान करत असताना त्याने ही गोष्ट मित्रांना सांगितली होती. 

याबद्दल ऐकताच मित्र घाबरले आणि त्यांनी थेट भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी लॉजवर धाव घेवुन मृतदेह ताब्यांत घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला.

 पोलिसांनी या प्रकरणातील दोघां आरोपींना अधिक चौकशीसाठी ताब्यांत घेतले आहे. मात्र पती कृष्णा कदम याने पत्नीचा खून कशासाठी केला,हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही,

Post a Comment

0 Comments