google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...कुर्डुवाडी परिसरात अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये पळवले

Breaking News

खळबळजनक ...कुर्डुवाडी परिसरात अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये पळवले

खळबळजनक ...कुर्डुवाडी परिसरात अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये पळवले


स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ग्रुप वर अथवा पर्सनल व्हॉट्सअॅप लिंक असे ग्रुप डिलीट करा 

कुर्डुवाडी शहरातील अनेक व्यापारी वर्गाच्या बैंक खात्यातील रक्कम एका लिंकमुळे उडाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ग्रुप वर अथवा पर्सनल व्हॉट्सअॅप लिंक येत होती. 

सदर लिंकवर क्लिक करताच व्हॉट्सअॅप नंबर हॅक केला जात होता. त्यानंतर थोड्याच वेळात स्टेट बँक ऑफ इंडियासह विविध बँकेतील सर्व रक्कम

 ऑनलाईन ट्रान्सफर करून काढून घेतली जात होती. सोमवार, दि.२७ मे रोजी रात्री ८ वाजल्या पासून ते दि.२८ मे दरम्यान हा प्रकार घडला.

याबाबत जयेश अशोककुमार बजानिया यांनी लेखी तक्रार कुर्दुवाडी पोलिसात दिली आहे. यात त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया सह विविध बँकेतील सुमारे दोन लाखाची रोकड गायब झाल्याचे म्हटले आहे. 

असाच प्रकार अनेकांबाबत घडल्याची चर्चा सुरु होती. मंदार शहा यांनी ही त्यांच्या मोबाईलचे व्हॉटस्अॅप हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

 तर अनेकांनी सायबर ब्राँचकडे ऑनलाईन तकार केली आहे वाचावत स्टेट बैंक ऑफकुडुवाडी पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने आपल्या मोबाईलमध्ये ग्रुप तयार होतो. किंवा त्याचा मेसेज डायरेक्ट येतो,

 त्या लिंकवर चुकून क्लिक झाले तर तुमचे खाते रिकामे होत आहे. अनेक पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार येऊ लागल्या आहेत.

 आपण अशा लिंकवर क्लिक करू नका, असे ग्रुप डिलीट करा किंवा मेसेज डिलीट करा. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले आहे.

इंडियाचे कुटुंवाडी ब्राँच मॅनेजर अविनाश वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी

सदर प्रकरण वरिष्ठांना कळवल्याचे सांगितले तर सदर प्रकरणात बँकेकडून तक्रार झाली नसल्याने गुन्हा नोंद झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले

Post a Comment

0 Comments