ब्रेकिंग न्यूज... 2024 : महाराष्ट्रातील नवे 48 खासदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.
शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे.
रत्नागिरीत भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत.
मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते पराभूत झाले आहेत.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर पराभूत झाले आहेत.
रवींद्र वायकर हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांचा पराभव केला.
धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे.
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.
परभणीत ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे. तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झालाय.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचा विजय झाला असून शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांचा पराभव झाला आहे.
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी विजय मिळवला असून शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा विजय झाला आहे.
पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या रवींद्र धनगेकर यांचा पराभव झाला आहे.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांचा विजय झाला असून सुजय विखे यांचा पराभव झालाय.
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा विजय साजरा केला असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाला आहे.
कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आहे. शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा पराभव झाला आहे.
औरंगाबादच्या तिहेरी लढतीमध्ये शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांचा विजय झाला आहे.
चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे.
जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.
काँग्रेसच्या डॉ.नामदेव किरसान यांचा विजय झाला असून भाजपचे अशोक नेते पराभूत झाले आहेत.
अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव झाला आहे.
जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांचा विजय झाला असून ठाकरे गटाच्या करण पवार यांचा पराभव झाला आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.
सांगलीच्या तिहेरी लढतील विशाल पाटील यांचा विजय झाला आहे.
ठाण्यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी झाले असून ठाकरे गटाचे राजन विचारे पराभूत झाले आहेत.
0 Comments