google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात हृदयरोग आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार निदान : डॉ. खांडेकर तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एसीजी मशीन उपलब्ध

Breaking News

सांगोला तालुक्यात हृदयरोग आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार निदान : डॉ. खांडेकर तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एसीजी मशीन उपलब्ध

सांगोला तालुक्यात हृदयरोग आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार निदान :


डॉ. खांडेकर तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एसीजी मशीन उपलब्ध

सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

हृदयरोग आजारासंबंधी कोणतीही तक्रार आसल्यास आता प्राथमिक आरोग्य केंद्रात अगदी मोफत उपचार होणार आहेत. त्या अनुषंगाने

 सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एसीजी मशीन उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार केवळ दहा मिनिटांमध्ये आजारासंबंधी माहिती अर्थात

 हृदयाचा अहवाल रुग्णालयात उपलब्ध होणार असल्याने हृदयविकारात्त्या विविध आजारासंबंधी मोफत शस्त्रक्रिया आता प्राथमि क आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होणार 

असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खाडेकर यांनी दिली आहे.हृदवासंबंधीत आजारावर अनेकदा गोरगरीब रुग्णांना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे 

व शहरी भागात वे जा करणे परवडत नसल्याने, उपचाराअभावी राहावे लागत होते. परंतु आता आपल्याच सांगोल्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकारासंदर्भात उपचाराची सोय झाली आहे. 

तेही अगदी मोफत उपचार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या स्टेमी प्रकल्पामुळे तालुक्यातील प्रावमि क आरोग्य केंद्रामध्ये एसीजी मशीन उपलब्ध झाले आहेत.

 या मशीनद्वारे केवळ दहा मिनिटांम ध्ये हृदवासंबंधीच्या आजारावर निदान करणे शक्य होणार आहे. सदरच्या मशीन प्राथमि एक आरोग्य केंद्र स्तरावर पोहोच झाल्या आहेत.

 याबाबत डॉक्टरांना त्या संबंधित माहिती देण्यात आली असून, या मशीन द्वारे अचूक निदान केले जाणार आहे. वानिमित्ताने हृदयरोग आजारावरील रुग्णांची आता आपल्याच गावात तेही मोफत सोय झाली आहे.

Post a Comment

0 Comments