google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...मावशीकडे नको ती मागणी; नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने केली निघृण हत्या

Breaking News

खळबळजनक...मावशीकडे नको ती मागणी; नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने केली निघृण हत्या

खळबळजनक...मावशीकडे नको ती मागणी; नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने केली निघृण हत्या


कर्नाटकातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकातल्या एका हत्येच्या खळबळजनक घटनेने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला मावशीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.विद्यार्थ्याने मावशीकडे लैंगिक संबंधांची मागणी केली होती.

 मात्र मावशीने त्याला नकार देऊन फटकारल्यामुळे मुलाला संताप अनावर झाला आणि त्याने काकीची गळा दाबून हत्या केली. 

या हत्येनंतर आरोपी मुलाने मावशीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. मात्र तपासात हत्या झाल्याचे उघड होताच मुलाला ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनगडी शहराजवळील एका गावात ही घटना घडली. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्या मावशीची हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.

 रविवारी रात्री एक ३७ वर्षीय महिला तिच्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास करून महिलेच्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली.

३७ वर्षीय महिला तिच्या घरात झोपली होती आणि आरोपी अल्पवयीन मुलगाही तिथे होता. 

अल्पवयीन मुलाने महिला झोपेत असताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या मावशी त्याला विरोध केला आणि फटकारले, तसेच त्याला असे वागू नको असं त्याला सांगितले. 

मावशी आपल्या कृत्याबद्दल इतरांना सांगेल या भीतीने काही वेळाने ती पुन्हा झोपली तेव्हा मी उशीने तिचा गळा दाबून खून केला, असे आरोपीने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले.

हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने त्याच्या वडिलांना मावशीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांना मुलाच्या बोलण्याचा संशय येऊ लागला.

 त्यामुळे त्यांनी मुलाकडे कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आपणच हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. सुरुवातीला पोलिसांना महिलेचा मृतदेह पाहून संशय आला होता. 

त्यानंतर आपल्या मुलीच्या पाठीवर ओरखडले आल्याची माहितीही त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यामुळे संशयाची सुई मुलाकडे वळली.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपल्या मावशीचा खून करण्यासाठी उशीचा वापर केल्याची कबुली दिली. तोंड दाबत असताना मावशी त्याला दूर ढकलत होते तेव्हा माझ्या पाठीवर ओरखडे आले असावेत असे त्याने सांगितले.

Post a Comment

0 Comments