मोठी बातमी..सांगोला येथे २६ जून रोजी पाणी परिषदेचे आयोजन आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत तालुक्यातील जनतेचा सहभाग
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):-क्रांतीचीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी सुरू केलेली दुष्काळी भागाला पाणी देण्याची चालु वर्षाची पाणी परिषद सांगोला येथे होणार आहे. २६ जुन रोजी ३२ वी पाणी परिषद प्रामुख्याने आटपाडी,
सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची आहे. यामध्ये लोकांनी उत्स्फुर्त सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक वैभव नायकवडी
आणि चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या जनतेला कृष्णा खोऱ्यातून हक्काचे पाणी देण्यासाठी
क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी १९९३ रोजी पहिली पाणी परिषद आयोजित करून लढा उभारला. आटपाडी तालुका केंद्रबिंदु मानुन सांगली, सातारा आणि
सोलापुर जिल्ह्यातील तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याची चळवळ गतीमान झाली. नागनाथअण्णा, दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील पाणी परिषदेने चिवट लढा दिला.
त्यातुन कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. नऊ वर्षापुर्वी आटपाडी, सांगोला तालुक्यात पाणी आले. टेंभु, म्हैसाळ, ताकारी प्रकल्पांचे पाणी तलाव, नदी ओढ्यांमध्ये आले आहे.
आता शेवटच्या घटकापर्यंत म्हणजेच शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा चळवळीमार्फत सुरू आहे.
पाण्यासाठीचा अंतिम टप्प्यातील लढा यशस्वी करण्यासाठी, दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राजर्षी शाहु महाराजांच्या जयंतीनिमिताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त
तालुक्यातील ३२ वी पाणी परिषद सांगोला येथे होत आहे. प्रामुख्याने आटपाडी, सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची पाणी परिषद बुधबार २६ जुन रोजी दुपारी सांगोला येथे होणार आहे.
यावेळी वैभव नायकवडी, प्रा. शिवाजीराव काळुगे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, डॉ. बाबुराव गुरव, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, अॅड. सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे,
प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, अॅड. सर्फराज बागवान, अनिल पाटील, प्रा. दताजीराव जाधव यांच्यासह पाणी संघर्ष चळवळीतील मान्यवर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
सांगली, सातारा व सोलापुर जिल्ह्यातील जनतेने ही पाणी परिषद यशस्वी करावी, असे आवाहनही पाणी संघर्ष परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments