google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...सख्खा मित्र ठरला पक्का वैरी! 500 रुपयांसाठी धारदार शस्त्राने वार... जागीच ठार

Breaking News

धक्कादायक...सख्खा मित्र ठरला पक्का वैरी! 500 रुपयांसाठी धारदार शस्त्राने वार... जागीच ठार

धक्कादायक...सख्खा मित्र ठरला पक्का वैरी! 500 रुपयांसाठी धारदार शस्त्राने वार... जागीच ठार 


अवघ्या पाचशे रुपयांसाठी मित्रानेच मित्राला संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये  घडली आहे. मोबाईल देण्यघेण्या वरून मित्रानेच मित्राचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिक मधील भारत नगर भागात ही घटना घडली असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

खुनाचे हे आहे कारण

संशयित अकिब उर्फ गुरफान इद्रिस सय्यद (28, रा. भारतनगर) आणि परवेझ अय्युब शेख (31, रा. भारतनगर) हे दोघ मित्र होते.

 आर्थिक अडचण असल्याने संशयित अकिब उर्फ गुरफान इद्रिस सय्यद याने स्वतःचा मोबाइल परवेझ अय्युब शेख याला विकला होता. बुधवारी अकिबने विकलेला मोबाइल परत देण्याची मागणी केली. 

मात्र, पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाले. आणि या वादात संशयित अकिब याने आपल्या जवळच्या

 धारदार शस्त्र परवेज याच्यावर वार केले. परवेज रक्तबंबाळ झाला होता. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

संशयीत आरोपीला अटक

परवेजच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्यानंतर अकिब पळ काढण्याचा प्रयन्त केला. मात्र, नागरिकांनी त्यास पकडले. त्यावेळी इथून गुन्हे शाखेचे अंमलदार अप्पा पानवळ हे जात असताना 

त्यांनी आकिबला ताब्यात घेतलं. यानंतर त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक व मुंबईनाका पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

 याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकिब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अकिब यास न्यायालयात हजर केलं असता, त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments