google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोल्हापूर: कुरुंदवाड येथील नवविवाहित पत्नीचा पुण्यात खुन, पतीला देहूरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नुकताच झाला होता विवाह सोहळा,

Breaking News

कोल्हापूर: कुरुंदवाड येथील नवविवाहित पत्नीचा पुण्यात खुन, पतीला देहूरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नुकताच झाला होता विवाह सोहळा,

कोल्हापूर: कुरुंदवाड येथील नवविवाहित पत्नीचा पुण्यात खुन,


पतीला  देहूरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नुकताच झाला होता विवाह सोहळा, 


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संभाजी पुरीगोसावी पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुरुवारी सायंकाळी नवविवाहित पतीने शरीर संबंधात नकार 

तसेच बाह्य अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केला या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले 

असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, देहूरोड येथील गाथा मंदिरांमागील आनंद डोह घाट परिसरांत गुरुवारी सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत खुनाची घटना घडली आहे,

 यामध्ये प्रतीक्षा जयदीप यादव (वय 21) असे खून झालेल्या नवविवाहित तिचे नाव आहे, तिचा पती जयदीप अर्जुन यादव (वय 29) रा. देहूगांव मूळ रा. चिखलगोळ जि. सांगली) याला पोलिसांनी अटक केली आहे, 

पोलीस अंमलदार किरण पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यवसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा 

आणि जयदीप हे दोन महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकले होते, प्रतीक्षा हिचे शिक्षण एमएसएसीपर्यंत जयदीप हा अभियांत्रिकी शाखेतील पदविकासधारक डिप्लोमा आहे, 

जयदीप हा एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे, गेल्या आठवडाभरांपूर्वी ते देहुगांव येथे राहण्यासाठी आले होते, पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीप याला होता,

 प्रतीक्षा आणि जयदीप हे दोघे गुरुवारी आनंद डोह घाट परिसरांत फिरायला गेले होते, तेथेच ओढणीने गळा आवळून जयदीपने तिचा खून केला

 तिचा व स्वतःचा मोबाईल घटनास्थळावरून इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे अधिक तपास करीत आहेत,*

Post a Comment

0 Comments