खळबळजनक घटना....“पोलिस पाटलाच्या घरावर चोरांनी मारला डल्ला
१ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास सांगोला तालुक्यातील घटना...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष ९५०३४८७८१२)
सांगोला : एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी करीत पोलिस पाटील व शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरातील लोखंडी कपाटातील
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरकांनी केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गौडवाडी येथे घडली.
गौडवाडी येथील पोलिस पाटील सोपान गडदे हे बुधवार, १ मे रोजी गावातील पाहुणे सुरेश शिंगाडे यांच्या मळ्यात कार्यक्रमास गेले होते.
दरम्यान, उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून त्यांची पत्नी रूपाली घरासमोरील कट्ट्यावर झोपल्या होत्या.
चोरट्याने हीच संधी साधून बुधवारी मध्यरात्री त्यांच्या उघड्या घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटाच्या लॉकरचा दरवाजा उघडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या
२ सोन्याच्या चेन, कानातील सोन्याची फुले व झुबे, लहान मुलांच्या हातातील सोन्याचे मनगटे, सोन्याची अंगठी, सोन्याचे बदाम, चांदीचे पैंजण यासह रोख ७ हजार ९०० रुपयांची चोरी केली
व तेथून त्यांच्या जवळच राहणाऱ्या कमल रुपनर यांच्या घरातील कपाटातून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरी करून तेथून धूम ठोकली.
अशी फिर्याद पोलिस पाटील सोपान जनार्दन गडदे (रा. गौडवाडी, ताः सांगोला) यांनी दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
“सर्व पोलीस पाटील व नागरिकांना कळविण्यात येते की 7 मे रोजी लोकसभा निवडणूकीचा बंदोबस्त असल्याने सर्व पोलीस प्रशासन बंदोबस्तामध्ये व्यस्त आहे.
तरी आपल्या गावांमध्ये कोणतीही चोरी घरफोडी होणार नाही याची काळजी घ्यावी व सर्वांनी प्रयत्नपूर्वक रात्रगस्त करावी.
त्याचप्रमाणे सूचना देऊन देखील सांगोला येथील पोलीस पाटील सोपान गडदे यांच्या घरी अंगणामध्ये झोपल्याने व दरवाजे उघडे ठेवल्यामुळे चोरी झालेली आहे.
तरी सर्व पोलीस पाटील यांनी आपल्या गावामधील लोकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी. असे आवाहन मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले.
0 Comments