google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू -मा.रविंद्र कांबळे.बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष

Breaking News

शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू -मा.रविंद्र कांबळे.बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष

शिक्षणात  मनुस्मृतीचा समावेश करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू - मा.रविंद्र कांबळे.बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला- (प्रतिनिधी) मनुस्मृतीच्या अभ्याक्रमातील चर्चेवरुन  बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी   तीव्र संताप व्यक्त केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम 'मनुस्मृती' ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले आहे. 

चातुर्वर्ण व्यवस्था आम्हाला मान्य नाही, असे बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी शिक्षणात  मनुस्मृतीच्या समावेशाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार, भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भागवत

 गीता  अध्याय पाठ करायला लावावा, अशी शिफारस एससीईआरटीने केली आहे. तर तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 

26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी  भागवत गीता बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.अशी माहिती मिळाली आहे.

तसेच काही मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव असल्याचीही चर्चा पुढे आली आहे त्यामुळे असा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी

 (शासनाने )मंजूर करू नये अन्यथा आम्हांला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments