google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे व पांडूरंग ऐवळे यांनी घेतला अवयवदानाचा स्तुत्य निर्णय

Breaking News

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे व पांडूरंग ऐवळे यांनी घेतला अवयवदानाचा स्तुत्य निर्णय

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे व पांडूरंग ऐवळे यांनी घेतला अवयवदानाचा स्तुत्य निर्णय


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): वाढेगाव ता. सांगोला येथील पांडूरंग ऐवळे आणि त्यांचे सुपुत्र अंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी एकत्र

 अवयवदान करून अवयवदाना बद्दल जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

वैभव गेली अनेक वर्ष अवयवदान करण्यासाठी जनजागृती करत आहेत. गेल्या वर्षी पंढरपूर वारीला देखील त्यांनी अवयवदान करण्यासाठीं जनजागृती केली होती.

 आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेत आपल्या वडिलांप्रमाणे वैभव यांनी देखील आपले सर्व अवयवदान केले आहे. 

वैभव यांनी सुरू केलेली समन्वय हि संस्था सामाजिक भान जपत गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवित असते. 

"ती आणि तिचे चार दिवस" मासिकपाळी जनजागृती उपक्रम "रद्दी ते समृद्धी" असे अनेक उपक्रम आदिवासी पाड्यांमध्ये राबवीत आहेत. 

आता वैभव ऐवळे यांनी अवयवदान करत एक नवीन मोहीम सुरू केली आहे. 

"सामाजिक तेचे ठेवून भान, चला करूया अवयवदान"

Post a Comment

0 Comments