शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने रेल्वे वेळापत्रक कार्ड वाटपाचा शुभारंभ संपन्न
दिल्ली, कलकत्ता , वास्को थेट रेल्वे सेवा सांगोल्यातून सुरू करण्याकरता कामटे संघटना प्रयत्नशील
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
रेल्वेच्या अनेक आग्रही मागण्यांकरिता अग्रेसर राहिलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक
संघटनेच्यावतीने सांगोला रेल्वे स्टेशनचे अद्यावत, सुधारित वेळापत्रक कार्डचे वाटप शुभारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला.
सुरुवातीस सांगोला रेल्वे स्टेशन येथे प्रमुख पाहुणे डॉ. अजिंक्य नष्टे व सांगोला स्टेशनचे अधीक्षक सत्येन्द्र कुमार सिंह, स्टेशन मास्तर राजेश पंडित यांच्या
हस्ते अशोक कामटे संघटनेने प्रकाशित केलेल्या 5000 प्रतींचा उद्घाटन समारंभ या प्रमुख मान्यवरांचे उपस्थित करून उपस्थित प्रवाशांना वाटप करण्यात आल्या.
यावेळी बोलताना डॉ अजिंक्य नष्टे यांनी अशोक कामटे संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करून
रेल्वेच्या सातत्याने कामटे संघटनेने प्रशासनापुढे प्रवाशांच्या समस्या मांडून त्या सोडविल्या आहेत
त्याबद्दल त्यांनी कामठे संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार काढले.
सत्येन्द्र कुमार सिंह यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून संघटना नेहमीच सर्व कार्यात तत्पर राहिली आहे
यापुढील काळात देखील संघटनेच्या माध्यमातून नविन गाड्या सुरू करण्याकरिता रेल्वे प्रवाशांच्या मागण्या
प्रशासनापुढे वेळोवेळी मांडून पाठपुरावा करावा असे शुभेच्छापर मनोगतात विचार व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविकात नीलकंठ शिंदे सर यांनी रेल्वे वेळापत्रक वाटप उपक्रमाचा उद्देश सांगितला तसेच येणाऱ्या पुढील
कालावधीत सांगोल्यातून थेट वास्को,दिल्ली, कलकत्ता, वाराणसी , पटना या रेल्वे सेवा सुरू होण्याकरता कामटे संघटनेचा पत्रव्यवहार, मीटिंगा,पाठपुरावा
सुरू असून संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी स्टेशनवरून कलबुर्गी -कोल्हापूर, कुर्डूवाडी- मिरज, कोल्हापूर- नागपूर या रेल्वेच्या वेळेत
सांगोला स्टेशनवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर वेळापत्रकाचे वाटप संघटनेच्या सदस्य, पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुदत्त खडतरे ,
संतोष पाटणे सर व आभार दिग्विजय चव्हाण सर यांनी मानले. यावेळी सांगोला स्टेशन मधील सर्व अधिकारी
कर्मचारी तसेच प्रवासी,शहरातील नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रेल्वे वेळापत्रक कार्ड ज्यांना आवश्यक आहे त्यांनी संघटनेच्या शिंदे मशिनरी स्टोअर्स स्टेशन रोड सांगोला येथील कार्यालयातून सकाळी 10 ते 05 या वेळेत सुयोग बनसोडे सर यांचेकडून घेऊन जावेत
अशी माहिती कामटे संघटनेच्यावतीने यावेळी देण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद अशोक कामटे संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments