सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरू
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला नगरपरिषद हद्दीतील नवीन बांधकाम केलेल्या मालमत्तांची नोंद नसल्याने नगरपरिषदेला कर उत्पन्नाला मुकावे लागत आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १२४
प्रमाणे सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नोंद नसलेल्या मालमत्तांची कर आकारणी करण्यासाठी पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
सदर कामकाज पूर्ण करण्याकरीता एकूण ३ पथके तयार करण्यात आली आहेत. तरीपुरवणी कर आकारणीकामी मालमत्तांचे मोजमाप घेण्यासाठी आलेल्या पथकांना सहकार्य करावे,
त्याचप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे मालकी हक्क कागदपत्र (७/१२ किंवा सिटी सर्व्हे उतारा), लाईट बिल झेरॉक्स, बांधकाम परवाना,
वापर परवाना इ. कागदपत्रे सदर पथकाकडे जमा करावीत अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १५० क
अन्वये पूर्वलक्षी प्रभावाने तसेच कलम १८९ अ अन्वये अनाधिकृत बांधकाम म्हणून सदर मालमत्तेची नोंद घेण्यात येईल असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.
0 Comments