सांगोला शहरात ग्राहकांना २४ तास विद्युत पुरवठा करण्यासाठी कटीबध्द ः सहाय्यक अभियंता रामदास घोडके
सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरात गेले दोन दिवस वादळी वार्यामुळे व पावसामुळे विज पुरवठा खंडित होत होता त्याचा विस्तृत उदाहरण म्हणजेच आपल्या
सांगोला शहर मध्ये चांगल्या कामासाठी व भविष्यात विज पुरवठा अखंड राहावा ह्या दृष्टिकोनातून आपण सब स्टेशन मध्ये नवीन ब्रेकर बसण्याचे काम चालू आहे.
सांगोला शहरात वीज ग्राहकांना 24 तास विद्युत पुरवठा करण्यास कटीबध्द आहे अशी माहिती सहाय्यक अभियंता रामदास घोडके यांनी दिली.
तसेच त्याच पद्धतीने ज्या जुन्या लाईन आहेत त्या जुन्या लाईन देखभाल दुरुस्ती आणि ज्या वहिनी आपल्या शहरांमध्ये आहेत
त्या वहिनीचं नवीन विद्युत वितरण करणे म्हणजेच जुने लाईन काढून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कंडक्टर वापरून
काम करणे ही योजना आपल्याला आलेली आहे. त्यासाठी आपल्याला विद्युत पुरवठा बंद करून ही योजना कार्यान्वीत करणे शक्य नाही म्हणूनच
आपल्या भविष्याच्या दृष्टीने विद्युत पुरवठा थोडा वेळ थोडा बंद केला तर आपलं काम हे भविष्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचा होणार आहे याची जाणीव सर्व ग्राहकांनी घ्यावी त्याच पद्धतीने
ज्या ठिकाणी जुने डिस्ट्रीब्यूशन बॉक्स आहेत त्या ठिकाणी नवीन डिस्ट्रीब्यूशन बॉक्स बसवणे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्युत पुरवठा आपल्या
शहरांमध्ये व्हावा या दृष्टीने सर्व प्रयत्न हे महावितरण कडून करण्यात येत आहेत त्या साठी आपला विद्युत पुरवठा बंद होत आहे परंतु हे सर्व काम एकाच दिवशी होऊ शकत नाही
आपला बुधवार हा देखभाल दुरूस्ती व तक्रारींचे निवारण करण्याचा दिवस आहे. परंतु त्याच दिवशी सगळं काम होऊ शकत नसल्याने ठराविक वेळेला
ठराविक ठिकाणी विद्युत खंडित करून त्या ठिकाणची देखभाल दुरुस्ती व तक्रारींचे निवारण करणे हे गरजेचे आहे. म्हणून आपल्या सांगोला शहरातील सर्व वीज ग्राहकांनी
भविष्याच्या दृष्टीने आपल्याला चांगला विद्युत पुरवठा व्हावा यासाठी दुरुस्तीसाठी सांगोल्याला योजना आली असून त्यासाठी आपण सहकार्य करावे
असे आवाहन महावितरण कंपनी सांगोला शहरचे सहाय्यक अभियंता रामदास घोडके यांनी केले आहे. सांगोला शहरात ग्राहकांना 24 तास सुरळीतपणे विद्युतपुरवठा करून ग्राहकांना त्रास होणार नाही
यासाठी आहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सर्वच कर्मचारी रात्रंदिवस शहरात सतर्क आहेत.गेली तीन ते चार दिवस वादळी वार्यामुळे अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत,
अनेक झाडे पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तो विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आहोरात्र अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
यापुढे नागरीकांना व ग्राहकांना अडचणी येऊ नयेत, विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सहा. अभियंता रामदास घोडके यांनी सांगितले.
0 Comments