ब्रेकिंग न्यूज...शेतकर्यांनी जळीताचे अनुदानासाठी 30 मे पर्यंत अर्ज करावेत ः तलाठी कुमाररवी राजवाडे
सांगोला/प्रतिनिधीः (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)
सांगोला शहरातील शेतकर्यांनी शासनाकडून आलेल्या जळीताचे अनुदानासाठी 30 मे पर्यंत सांगोला येथील
तलाठी कर्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन सांगोला शहराचे गाव कामगार तलाठी कुमाररवि राजवाडे यांनी केले.
सांगोला शहरात 5000 शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी 1700 ते 1800 शेतकरी खातेदारांनी जळीत अनुदानासाठी अर्ज भरले आहेत.
उर्वरीत शेतकरी खातेदारांनी जळीत अनुदानासाठी अर्ज करण्यास कसलाही प्रतिसाद दिला नाही.
जळीताचे अनुदानासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 मे पर्यंत आहे. तरी सांगोला शहरातील शेतकरी खातेदारांनी 30 मे पर्यंत जळीतासाठी अर्ज न केल्यास परत अनुदान मिळणार नाही.
30 मे पर्यंत शहरातील सर्व शेतकरी खातेदारांनी शासनाच्या जळीत अनुदानासाठी अर्ज करावेत असे आवाहन गाव कामगार तलाठी कुमाररवि राजवाडे यांनी केले.
0 Comments