जय मल्हार क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी शामराव बोडरे यांची निवड
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सातारा ; सातारारोड येथे लोकसभा २०२४ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत,
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी निवडीचे पत्र देवून सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी शामराव मधुकर बोडरे रा.सोनलवाडी ता.सांगोला यांची निवड केली.
तसेच शहाजी गिनाप्पा चव्हाण रा.अजनाळे ता.सांगोला यांची सांगोला तालुका अध्यक्षपदी,सोमनाथ मारूती मंडले रा.सांगोला यांची सांगोला तालुका युवक अध्यक्षपदी,शिवाजी बाबुराव चव्हाण यांची रा.अजनाळे ता.सांगोला
यांची,सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी,सचिन भिमराव मंडले रा.एखतपूर ता.सांगोला यांची जिल्हा युवक उपाध्यक्षपदी,नामदेव उमाजी बोडरे रा.सोनलवाडी ता.सांगोला यांची
सांगोला तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवडी करण्यात आल्या.याप्रसंगी सांगोला तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments