माढ्यात धैर्यशील यांचा पुढील तेरा घटनांमुळे पराभव अटळ!
माढा : माढ्याची जागा धैर्यशील मोहिते पाटील हरणार आहेत. कारण माढा लोकसभा मतदारसंघात महत्वपूर्ण घटना घडणार आहेत.
भाजपाने व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली
जोरदार मोर्चेबांधणी केल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील यांचे तीन तेरा वाजणार असल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्याची जागा प्रतिष्ठेची केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापूर येथे एकच सभा होणार होती.
परंतु फडणवीस यांनी दिल्ली दरबारात आपली ताकद वापरून माळशिरस येथे पंतप्रधान मोदींची सभा घडवून आणली.
याच सभेने निवडणुकीचे वारे माळशिरस तालुक्यात फिरले. “पंतप्रधान मोदींनी डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडे, मुखातून ‘येळकोट येळकोट जयमल्हार’च्या जयघोषाने सभा दणाणून सोडली.
माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९६ हजार मतदारांपैकी ७ लाखाहून जास्त लोकसंख्या धनगर समाजाची आहे.
आपल्या वेशभूषेत आपल्या दैवताचा जयघोष, त्यामुळे लाखो धनगर समाजाच्या हृदयसिंहासनावर मोदींनी राज्य केले. मत देणारा मोदींना पाहून मत देणार आहे.
मोदींनी सांगितले तुम्ही दिलेलं मत मला डायरेक्ट मिळणार आहे. त्यामुळेच मोदींनी प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या जनसमुहाची मनं जिंकली,
त्याचे मतात रूपांतर होणार आहे ही झाली पहिली घटना. दुसरी घटना म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल परिवाराने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलेला पाठिंबा.
तिसरी घटना म्हणजे पंढरपूर तालुक्यातील ५८ गावे माढा मतदारसंघात येतात आणि या गावातून आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे,
विठ्ठल परिवाराचे सात कारखान्याचे सर्वेसर्वा अभिजित पाटलांचे शेतकऱ्यांत असलेले प्रचंड संघटन व लोकप्रियता खा. निंबाळकरांना मताधिक्य देणार आहे.
चवथी महत्वाची घटना सांगोला तालुक्यात दोन टिएमसी एवढे पाणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मिळवून दिले.
ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी माण नदीत आणून सांगोला तालुक्यात एक सकारात्मक वातावरण भाजपाच्या बाजूने निर्माण केले आहे.
विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांचे प्रभावी कार्य, नेतृत्व, संघटन खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना मताधिक्य निश्चित देणार आहे.
पाचवा मुद्दा ८०० कोटींचा निधी सांगोला तालुक्याच्या सिंचन प्रकल्पासाठी खा. निंबाळकरांनी मंजुर करून घेतला.
सहावी घटना मोहिते पाटलांकडे सांगोला तालुक्यात प्रभावी नेतृत्व पाठीमागे नाही. शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख स्वत:च उमेदवार म्हणून इच्छुक होते,
त्यांना डावलून तुतारी धैर्यशील यांना देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते मोहिते पाटलांवर नाराज आहेत. सातवी घटना करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांची ताकद खूपच दुबळी आहे.
करमाळ्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदेयांची ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी आहे.
निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच खा. निंबाळकरांनी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांची साखर संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर वर्णी लावून त्यांचा भाजपा प्रवेश घडवून आणला.
तसेच माजी आमदार जयंतराव जगताप, त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप या सर्व मातब्बर नेत्यांची ताकद करमाळा तालुक्यात आहे.
बंडखोर परिवाराच्या सर्व्हेनुसार खा. निंबाळकरांना सर्वात जास्त लीड याच तालुक्यातून मिळणार आहे. आठवी घटना माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे हे आमदार म्हणून आठ वेळा निवडून आले आहेत.
एक अनुभवी सेनापती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचे सेनापती पद सोपविले आहे.
नामदार तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांना मानणारा फार मोठा वर्ग या तालुक्यात आहे.
सावंत बंधू महायुतीच्या शिवसेनेत तर शिंदे बंधू अजितदादा गटात त्यामुळे एक लाखाचे लीड माढा तालुक्यातून देणार हा आमदार बबनदादा शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आहे.
नववी घटना माण-खटाव तालुक्यातून विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची ताकद सातारा जिल्ह्यातील तालुका आणि सातारा जिल्ह्यातील उमेदवार म्हणून सहानुभूतीचा फायदा खा. निंबाळकरांना होणार आहे.
दहावी घटना म्हणजे फलटणला खा. निंबाळकरांचे होम ग्राउंडफलटणला मिळवून दिलेले पाणी, त्यामुळे शेतकरी वर्गात एक आशावादी दृष्टिकोन निर्माण झाला आहे.
अकरावी घटना म्हणजे माळशिरस तालुक्यातून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी खा. निंबाळकरांना दिलेला पाठिंबा, तसेच धवलसिंह यांच्या
सौभाग्यवती उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी होम टू होम उन्हातान्हात केलेला प्रभावी प्रचार यंत्रणा जनसेवा संघटना आणि धवलसिंह युवा मंचची संघटनशक्ती खा. निंबाळकरांच्या पाठीशी आहे.
बारावी घटना म्हणजे खुडूस येथे ४५ गावातील सरपंच उपसरपंचांनी दिलेला खा. निंबाळकरांना पाठिंबा आणि उत्तम जानकरांच्या निर्णयावर टाकलेला बहिष्कार. तेरावी घटना
आमदार राम सातपुते यांचे पश्चिम माळशिरस तालुक्यात आरोग्यदूत, कार्यसम्राट अशी ओळख आरएसएसचे मजबूत संघटन, युवाशक्ती, शेतकरी वर्गात असलेली लोकप्रियता यामुळे खा. निंबाळकरांना लीड मिळणार आहे.
माळशिरस तालुक्यात एक नंबरला धनगर समाज, तर दोन नंबरला माळी समाज लोकसंख्येत आहे.
दि सासवड शुगर माळीनगरचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांचे प्रचंड संघटन खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना तालुक्यातून दहा हजारांचे लीड देणार
असे रंजनभाऊ गिरमे आत्मविश्वासाने म्हणतात हे सत्य वाटते. या प्रमुख तेरा घटनांमुळे धैर्यशील यांचे तीन तेरा वाजणार असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
0 Comments