(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) - आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य दिनेश खटकाळे यांच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस फळं कापून व पालावर राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.
विलासराव भगवान खटकाळे व सौ. सीताबाई विलासराव खटकाळे यांच्या लग्नाचा वाढदिवस शुक्रवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
वासुद रोड पाण्याच्या टाकीजवळ पालावरील बाळगोपाळासमवेत केकऐवजी फळं कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रारंभी स्नुषा सौ. ऋतुजा दिनेश खटकाळे यांनी उभयतांचे औक्षण केले तसेच आपुलकीच्या उपस्थित सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बाळगोपाळाना खाऊ व फळं वाटप करण्यात आली.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, इंजि. बाळासाहेब नकाते, सुरेशकाका चौगुले, अरविंद डोंबे, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी,
डॉ. अनिल कांबळे, अजयकुमार बाबर गुरुजी, प्रसन्न कदम, दत्तात्रय खटकाळे आदी आपुलकी सदस्य तसेच दिलीप जाधव, कु.आर्वी काशिद उपस्थित होते.
0 Comments