खळबळजनक...११ बुलेटच्या पैजेतून पाटील भावंडांची माघार कायद्याचे कारण देत
फलटणच्या अनुप शहांचे आव्हान न स्वीकारताच काढला पळ
माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील यांची तुतारीच निवडून येणार असल्याचा विश्वास घेऊन ११ बुलेटच्या शर्यतीचे चॅलेंज लावलेल्या
योगेश पाटील व नीलेश पाटील या भावंडांनी अखेर शर्यतीतूनच माघार घेतली आहे. पाटील बंधूंचे चॅलेंज फलटणच्या अनुप शहा यांनी स्वीकारले होते.
मात्र दोघांच्या ही शर्यतीची रक्कम शनिवारी द्यायची असतानाच अंतिम टप्यात पाटील बंधूंनी माघार घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान पाटील बंधूंनी माघार घेतल्याने भाजप व रणजितसिंह निंबाळकर समर्थकांकडून टीकेची झोड उठवली आहे.
• मला ज्यांनी आव्हान दिले होते त्या दोघा पाटील भावंडांनी कायदेशीर अडचण येत असल्याने माघार घेतली असल्याची माहिती समजली आहे.
वास्तविक पाहता त्यांनी दिलेले कारण हे पळपुटे पणाचे धोरण असून माझी आजही पूर्ण तयारी आहे. माघार घेऊन त्यांनी पराभवच मान्य केला आहे. - अनुप शहा, फलटण भाजपा शहराध्यक्ष
• महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे या शर्यती बाबत पोलीस कारवाई देखील करू शकतात. अशा प्रकारची शर्यत प्रसार माध्यमांचा वापर करून प्रकाशित करणे
हे देखील कृत्य कायद्याने प्रतिबंधित आहे. पोलिस देखील गुन्हा दाखल करू शकतात. - अॅड. पांडुरंग खोत, माढा
११ बुलेटच्या शर्यतीची सर्वत्र चर्चा झाली. अशा पैजैचा विडा प्रतिस्पर्धीने उचलला. त्यानंतर आम्ही तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केल्यानंतर वकिलांनी
आम्हाला पैजेचा विषय कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा सल्ला दिल्यानुसार शर्यतीतून माघार घेत असल्याचे नीलेश पाटील यांनी म्हटले आहे.
0 Comments